अकोला : शहर बस वाहतूक सेवेचा कंत्राट रद्द करून शहरवासीयांसाठी नवीन चार वाहनांची तात्पुरती व्यवस्था उभारण्याची महापालिकेची गर्जना हवेत विरली आहे. ३ ऑगस्ट रोजी शहर बस वाहतूक सेवेचा कंत्राट संपुष्टात येत असल्याने व नवीन वाहनांची पर्यायी व्यवस्था न झाल्याने अखेर मनपाने भंगार झालेल्या दहा ह्यएएमटीह्णबस स्वत:च चालविण्याचा निर्णय २ ऑगस्ट रोजी घेतला. याकरिता मनपात कार्यरत ४0 चालक-वाहकांची बस सेवेसाठी नियुक्ती करण्यात आली. महापालिकेत सत्तास्थानी असलेल्या भाजप-शिवसेनेच्या क ार्यकाळात प्रशासनाने शहर बस वाहतुकीचा कंत्राट सहकारी तत्त्वावर अकोला प्रवासी व मालवाहतूक संस्थेला दिला होता. करारानुसार मनपा व चालक-वाहकांचे वेतन देण्यास संस्थेला अपयश येऊन संस्था डबघाईस आली. २३ ह्यएएमटीह्ण बसपैकी रस्त्यावर केवळ सात बस धावत असून, परवान्याचे नूतनीकरण न केल्यामुळे तीन बस उपप्रादेशिक परिवहन विभागाकडे जमा आहेत. एकूणच परिस्थिती पाहता, ३ ऑगस्टपासून बस सेवा बंद करण्याचा निर्णय संबंधित संस्थेने घेतला होता. त्यापूर्वी भंगार बसमधून अकोलेकरांची वाहतूक जीवघेणी असून, अपघात घडल्यास सर्वप्रथम आयुक्त व महापौर यांच्यावर फौजदारी दाखल होईल, ही सबब पुढे करीत प्रशासनाने हा कंत्राट रद्द करण्याचा प्रस्ताव १८ जुलैच्या सर्वसाधारण सभेत मांडला होता. कंत्राट रद्द केल्यास अकोलेकरांची गैरसोय होईल, ती टाळण्यासाठी चार नवीन वाहनांची पर्यायी व्यवस्था करण्याचे निर्देश सभेत महापौर ज्योत्स्ना गवई यांनी दिले होते. तर मुंबई येथील एक कंपनी बस वाहतुकीसाठी इच्छुक असल्याचे आयुक्तांनी स्पष्ट केले होते. यादरम्यान, शहर बस वाहतूक सेवेचा कंत्राट देण्यासाठी प्रशासनाने कोणतीही निविदा प्रक्रिया न राबवता, लवकरच नवीन बस सेवा सुरू करण्याचे दिवास्वप्न अकोलेकरांना दाखवले. अवघ्या तीनच दिवसात प्रशासनाचे पाय जमिनीवर आले. तूर्तास रस्त्यावर धावणार्या सात बसेस व ह्यआरटीओह्णकडे जमा असलेल्या तीन बसेस अशा एकूण दहा ह्यएएमटीह्ण बसेस मनपाने स्वत: चालविण्याचा निर्णय घेतला आहे. याकरिता २0 चालक व २0 वाहकांच्या नियुक्तीचे आदेश २ ऑगस्ट रोजी जारी करण्यात आले.
** उद्या रंगीत तालीम
मनपामध्ये ४४ चालक कार्यरत आहेत. यापैकी २0 चालकांची शहर बस वाहतुकीसाठी निवड करण्यात आली आहे. तसेच २0 कर्मचार्यांची वाहक म्हणून निवड करण्यात आली. शहरातील प्रमुख तीन मार्गांवर सदर बसेस धावतील. याकरिता ३ ऑगस्ट रोजी रंगीत तालीम होईल. तर मनपाचे विभाग प्रमुख यांना बसगाड्या व प्रवाशांची तिकीट तपासण्याचा तात्पुरता अधिकार देण्यात आला आहे.
** जीवघेण्या वाहतुकीवर तोडगाच नाही!
शहरातील सर्व बसेस भंगार झाल्या असून, त्यांचा कधीही अपघात होऊ शकतो, अशी परिस्थिती आहे. ही बाब समोर ठेवूनच प्रशासनाने हा कंत्राट रद्द करण्याची घोषणा केली होती. परंतु नवीन बस उपलब्ध न झाल्याने प्रशासनाने पुन्हा याच भंगार बसचा पर्याय निवडला. अर्थातच, प्रशासनाला अकोलेकरांच्या जीवाची काडीचीही किंमत नाही, हे स्पष्ट होत आहे.
** निविदा काढव्याच लागतील
शहर बस वाहतूक सेवेसाठी पुन्हा नव्याने निविदा प्रक्रिया राबवावी लागणार आहे. प्रशासनाने निविदा काढल्यास प्रक्रिया पूर्ण करून बस रस्त्यावर धावण्यासाठी किमान दीड ते दोन महिन्यांचा कालावधी लागणार आहे.