अकोट निवडणूक निकाल : प्रकाश भारसाकळेंनी घेतली निर्णायक आघाडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 24, 2019 02:41 PM2019-10-24T14:41:57+5:302019-10-24T14:42:24+5:30

Akot Vidhan Sabha Election Results 2019: भारसाकडे यांनी २० व्या फेरीअखेर प्रतिस्पर्धी उमेदवारांवर तब्बल ८ हजारांची निर्णायक आघाडी घेतली आहे.

Akot Election Results 2019: Maharashtra vidhan sabha election Results 2019; Prakash Bharsakale take leads | अकोट निवडणूक निकाल : प्रकाश भारसाकळेंनी घेतली निर्णायक आघाडी

अकोट निवडणूक निकाल : प्रकाश भारसाकळेंनी घेतली निर्णायक आघाडी

googlenewsNext


अकोला : दरवेळी नवा आमदार देणारा मतदारसंघ अशी ओळख असलेल्या अकोट मतदारसंघात यावेळी भाजपचे विद्यमान आमदार प्रकाश भारसाकळे हे दुसऱ्यांदा आमदार होण्याच्या दिशेने आगेकुच कत आहेत. मतमोजणी सुरुवात झाल्यापासूनच आघाडी घेणाºया भारसाकडे यांनी २० व्या फेरीअखेर प्रतिस्पर्धी उमेदवारांवर तब्बल ८ हजारांची निर्णायक आघाडी घेतली आहे.
विसाव्या फेरीअखेर भारसाकळे यांना ३९९३९ मते मिळाली आहेत, तर वंचित बहूजन आघाडीचे अ‍ॅड. संतोष रहाटे यांना ३१६२२ मते मिळाली आहेत. काँग्रेसचे संजय बोडखे यांना २४४३५ मते मिळाली आहेत. अजून चार फेºया होणे बाकी असून, निर्णायक आघाडी घेतलेले भारसाकळे हे दुसऱ्यांदा आमदार होण्यासाठी सज्ज असल्याचे चित्र आहे.
अकोट मतदारसंघात १९६२ व १९६७ या सलग दोन टर्ममध्ये आबासाहेब खेडकर हे आमदार होते. त्यांच्यानंतर सलग दुसºयांदा आमदार होण्याची संधी या मतदारसंघाने कुणालाही दिलेली नाही. सुधाकरराव गणगणे व बाळासाहेब तायडे हे दोन वेळा आमदार होते; मात्र त्यांच्या कार्यकाळात ब्रेक होता. त्यामुळे यावेळी आमदार प्रकाश भारसाकळे यांनी विजय मिळविला तर तो इतिहास ठरेल. जर भाजपाचा पराभव होऊन काँग्रेस, वंचित किंवा अपक्षाने बाजी मारली तर दरवेळी आमदार बदलणारा मतदारसंघ हा अकोटचा लौकिक कायम राहील.

Web Title: Akot Election Results 2019: Maharashtra vidhan sabha election Results 2019; Prakash Bharsakale take leads

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.