शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
3
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
4
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
5
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
6
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
7
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
8
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
9
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
10
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
11
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
12
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
13
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
14
पोलिसाच्या घरातच चोरी; सोन्याचे मंगळसूत्र, २ मोबाईलसह मौल्यवान वस्तू घेऊन चोर फरार!
15
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार
16
सोन्याच्या दरात मोठी घसरण; १० ग्रॅम सोन्यासाठी किती करावा लागणार खर्च, जाणून घ्या
17
पाकिस्तानला जाणारे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
18
"पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी नव्हेत तर स्वातंत्र्यसैनिक’’, पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांचं विधान 
19
Pahalgam Terror Attack : पहलगाममधील भाजपा कार्यकर्त्यासाठी नजाकत बनला 'देवदूत'; पत्नीचा, लेकीचा वाचवला जीव
20
चीननं उचललं मोठं पाऊल, भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर्स क्रॅश; विकण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग

अकोला: ‘व्हीएनआयटी’ने शहरातील सिमेंट रस्त्यांचे घेतले नमुने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2020 10:46 IST

वर्षभरानंतर ‘व्हीएनआयटी’च्या चमूने शनिवारी शहरातील सिमेंट रस्त्याचे नमुने घेण्याला प्रारंभ केला.

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला: शहरात तयार करण्यात आलेले सिमेंट रस्ते अत्यंत निकृष्ट दर्जाचे असल्याचे ‘लोकमत’ने उघडकीस आणले होते. याप्रकरणी मनपा आयुक्त संजय कापडणीस यांनी नागपूर येथील ‘व्हीएनआयटी’ मार्फत रस्त्यांची तपासणी करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर हा मुद्दा मागे पडला होता; मात्र वर्षभरानंतर ‘व्हीएनआयटी’च्या चमूने शनिवारी शहरातील सिमेंट रस्त्याचे नमुने घेण्याला प्रारंभ केला.राज्यात तत्कालीन काँग्रेस सरकारच्या कालावधीत शहरातील रस्ते दुरुस्तीसाठी सन २०१२-१३ मध्ये १५ कोटी रुपयांचा निधी प्राप्त झाला होता. तत्कालीन मनपा आयुक्त डॉ. महेंद्र कल्याणकर यांनी प्राप्त निधीतून डांबरीकरणाचे १८ रस्ते प्रस्तावित केले होते. या रस्त्यांचे अठरा फूट रुंदीकरण करण्याचे निर्देश त्यांनी बांधकाम विभागाला दिले होते. त्यानुसार बांधकाम विभागाने निविदा प्रसिद्ध केली. या कालावधीत मनपाच्या आयुक्तपदाची सूत्रे स्वीकारणाऱ्या तत्कालीन आयुक्त अजय लहाने यांनी ‘वर्किंग एस्टीमेट’ मध्ये बदल करून अठरा फूट रुंदीचे रस्ते चाळीस फूट रुंद करण्याचा निर्णय घेतला, तसेच यापैकी प्रमुख सहा रस्त्यांचे सिमेंट काँक्रिटीकरण करण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी लागणारा निधी शासनाकडून घेण्यात आला.स्थानिक ‘आरआरसी’ कन्स्ट्रक्शनला सिमेंट रस्त्यांची कामे देण्यात आली; परंतु ही कामे सुरू केल्यानंतर अवघ्या सहा महिन्यातच सिमेंट रस्त्यांचे पितळ उघडे पडले. रस्ता तयार झाल्यानंतर लगेच ठिकठिकाणी भेगा पडून तडे गेले, तसेच अनेक ठिकाणी खड्डे पडल्याचे समोर आले होते.

तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांचा अहवाल सारला बाजूलाशहरातील निकृष्ट सहा सिमेंट रस्त्यांपैकी चार सिमेंट रस्ते मनपाच्यावतीने तयार करण्यात आले, तसेच उर्वरित दोन रस्ते सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत तयार करण्यात आले. या दोन्ही रस्त्यांचे काम निकृष्ट दर्जाचे झाल्याचे उघडकीस आल्यानंतर तत्कालिन जिल्हाधिकारी आस्तिककुमार पांडेय यांनी सिमेंट रस्त्यांची तपासणी करून चौकशी अहवाल मनपाकडे सादर केला होता. हा अहवाल बाजूला सारत मनपा आयुक्त संजय कापडणीस यांनी सिमेंट रस्त्याची ‘व्हीएनआयटी’मार्फत पुन्हा तपासणी करण्याचा निर्णय घेतला, हे विशेष.दोन सिमेंट रस्त्यांचे वीस नमुने जमा व्हीएनआयटी च्यावतीने प्रा.फैसल व त्यांच्यासोबतच्या चार कर्मचाºयांनी शनिवारी दुर्गा चौक ते अग्रसेन चौक तसेच टॉवर ते रतनलाल प्लॉट चौकपर्यंतच्या रस्त्याचे कोअर कटरच्या माध्यमातून प्रत्येकी दहा-दहा असे एकूण वीस नमुने घेतले.

कोट्यवधींचा खर्च पाण्यातदुर्गा चौक अग्रसेन चौक- २ कोटी ४० लाखटॉवर ते रतनलाल प्लॉट चौक-२ कोटी ४८ लाखसिव्हिल लाइन ते मुख्य पोस्ट आॅफिस चौक-२ कोटी ९२ लाख ४८ हजारमाळीपुरा ते मोहता मिल- २ कोटी ४५ लाख ५९ हजार

 

टॅग्स :AkolaअकोलाAkola Municipal Corporationअकोला महानगरपालिका