शहरं
Join us  
Trending Stories
1
PHOTO: संपूर्ण ठाकरे कुटुंब एकाच व्यासपीठावर एकत्र... खास पोज देत काढला 'फॅमिली फोटो'
2
"हिंदुत्व ही कोणत्याही भाषेची मक्तेदारी नाही, आम्ही मराठी बोलणारे तुमच्यापेक्षा…’’, उद्धव ठाकरेंनी भाजपाला सुनावले
3
राज ठाकरेंजवळ आदित्य, उद्धव ठाकरेंजवळ अमित, सुप्रिया सुळेंनी एकत्र आणलं; पाहा Video
4
Uddhav Thackeray pats Raj Thackeray Video : कौतुकाची थाप..!! राज ठाकरे यांच्या भाषणानंतर उद्धव ठाकरे यांच्या कृतीने मराठी माणूस सुखावला...
5
"निवडणुकीत हरणार म्हणून कुटुंब "तहात" जिंकण्याचा प्रयत्न"; भाजपाचा पलटवार
6
"३० वर्ष झाली तरी मराठी माणसासारखी..."; सुशील केडियांनी राज ठाकरेंची जाहीर माफी मागितली
7
Zerodha च्या संस्थापकांचा मोठा इशारा, एक्सचेज आणि ब्रोकर्ससाठी वाईट ठरू शकतं हे वृत्त; का म्हणाले नितीन कामथ असं?
8
Raj-Uddhav Thackeray Vijayi Melava Live Update: ...तर आहोत आम्ही गुंड; उद्धव ठाकरेंचं मुख्यमंत्री फडणवीसांना आव्हान
9
Raj Thackeray : "तुमच्याकडे सत्ता विधान भवनात असेल, आमच्याकडे रस्त्यावर...",हिंदी सक्तीवरुन राज ठाकरेंचा राज्य सरकारला इशारा
10
Uddhav Thackeray : "आमच्या दोघांमधला अंतरपाट अनाजी पंतांनी दूर केला"; उद्धव ठाकरेंचा फडणवीसांना टोला
11
Raj Thackeray : ठाकरेंची मुलं इंग्रजी मीडियममध्ये शिकली, या आरोपावर राज ठाकरेंनी स्पष्टच सांगितलं
12
मराठी कलाकारांसमोर राज ठाकरेंकडून बॉलिवूडच्या ए.आर.रहमानचं कौतुक, सांगितला 'तो' प्रसंग
13
"जे बाळासाहेबांना आणि इतरांना जमलं नाही ते फडणवीसांना जमलं’’, राज ठाकरे यांचं मोठं विधान
14
"एकत्र आलो एकत्र राहण्यासाठी, आमचं एकत्र दिसणं महत्त्वाचं," उद्धव ठाकरेंचं सूचक विधान
15
Raj Thackeray : जास्त नाटकं केली, तर कानाखाली आवाज काढलाच पाहिजे; पण...; राज ठाकरेंचा 'सैनिकां'ना आदेश
16
सुरतेची "स्वारी" आता हुजरेगिरीसाठी उरली...; अमोल कोल्हेंचा एकनाथ शिंदेवर कवितेतून निशाणा
17
'मुंबई आकर सारी हेकडी निकाल दूंगा', पप्पू यादव यांचे राज ठाकरेंना चॅलेंज!
18
खळखट्याक सुरू; मराठीत बोलणार नाही म्हणणाऱ्या सुशील केडिया यांचं कार्यालय फोडलं
19
त्रिनिदाद आणि टोबॅगोच नव्हे, 'या' २५ देशांनी देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिलाय सर्वोच्च सन्मान!
20
"इथेच येऊन बिजनेस करता आणि...", सुशील केडियांवर संतापले भरत जाधव, म्हणाले- "मराठी माणसाने जागं व्हायला हवं..."

कृषी विद्यापीठाचे जलस्रोत पडले कोरडे!

By admin | Updated: May 11, 2014 18:14 IST

डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचा पाण्याचा मुख्य स्रोत बंद झाला आहे.

अकोला : डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचा पाण्याचा मुख्य स्रोत बंद झाला आहे. सध्या विहिरींच्या पाण्यावर संशोधनाचे प्लॉट जगविले जात आहेत. विहिरींची पातळी खोल गेल्याने संशोधन जगविण्यासाठी पाणी आणणार कुठून, असा प्रश्न कृषी विद्यापीठासमोर निर्माण झाला आहे.या कृषी विद्यापीठाकडे जवळपास पाच हजार एकरच्यावर शेतजमीन आहे. यात मुख्य बीजोत्पादन क्षेत्र वणीरंभापूर, मध्यवर्ती संशोधन केंद्रांतर्गत सर्वाधिक जमीन आहे. या दोन्ही प्रक्षेत्रावर विविध संशोधन कंेद्र आहेत. पण पाणीच उपलब्ध नसल्याने या संशोधन केंद्रांतर्गत संशोधनाचे काम करणार्‍या शास्त्रज्ञांपुढे यक्षप्रश्न निर्माण झाला आहे. शेतकर्‍यांना कमी खर्चाचे तंत्रज्ञान, कृषी निविष्ठा अर्थात बी - बियाणे संशोधन करू न शेतकर्‍यांना उपलब्ध करू न देण्याची जबाबदारी त्यांच्यावर आहे. त्याकरिता शास्त्रज्ञाच्या वेतनावर शासन मोठा खर्च करीत आहे. भारतीय कृषी संशोधन परिषद, कंेद्र व राज्य शासन संशोधनाकरिता निधी उपलब्ध करू न देते. तथापि पाण्याचा कायमस्वरू पी स्रोत उपलब्ध केला जात नाही. त्यामुळे भविष्यात शास्त्रज्ञांना हातावर हात धरू न बसण्याची वेळ येण्याची शक्यता नाकारता येत नाही. या कृषी विद्यापीठाला मोर्णा धरणातून पाणी मिळत होते. या पाण्यावर कृषी विद्यापीठाच्या शरद सरोवरात मुबलक पाणी असायचे, हे सरोवर कृषी विद्यापीठाची मुख्य धमणी आहे. या तलावातून ग्रॅव्हिटीने पाणी संशोधन प्रकल्पापर्यंत सोडले जायचे, पण अलीकडच्या काही वर्षात कृषी विद्यापीठाला मोर्णा धरणातून पाणी मिळणे बंद झाले आहे. त्याचा परिणाम संशोधनावर होत आहे. यावर्षी अकोल्यातील मध्यवर्ती संशोधन प्रकल्पाच्या क्षेत्रावर जेमतेम संशोधनाचे प्लॉट आहेत. तेलबिया संशोधन विभागाच्या प्रक्षेत्रावर बोअरवेलच्या पाण्यावर भुईमूग संशोधनाचे प्लॉट जगविले जात आहेत. दरम्यान, कृषी विद्यापीठाला कायमचा पाण्याचा स्रोत उपलब्ध नसल्याने त्याचा परिणाम बीजोत्पादन, बियाणे उत्पादनावर होत आहे. आता ज्या काही क्षेत्रावर पेरणी केली आहे. या मे महिन्यात तगेल की नाही, हा प्रश्न आहे. त्यामुळे कायमस्वरू पी पाणी मिळवून देण्याचे आव्हान कुलगुरू डॉ. रविप्रकाश दाणी यांच्यासमोर आहे.