शहरं
Join us  
Trending Stories
1
...अन् यशस्वी जैस्वालची बॅट दांड्यातून निखळली; किती वेगाने आला होता चेंडू? जाणून घ्या बॅटची किंमत
2
गुजरात ATS ची मोठी कारवाई; अल-कायदाशी संबंधित चार दहशतवाद्यांना अटक
3
"महायुती सरकारने महाराष्ट्राचा बनवला तमाशा, विधानसभेत क्लब तर बाहेर WWF चा आखाडा’’, काँग्रेसची बोचरी टीका  
4
IND vs ENG : यशस्वीची फिफ्टी ठरली खास; कारण ओल्ड ट्रॅफर्डच्या मैदानात ५० वर्षांनी असं घडलं
5
"तुम्ही लहान होतात, तुमच्या आई-वडीलांच्या सरकारमध्ये..."; नितीश यांनी तेजस्वी यादवांना सुनावलं
6
चार किलो सोनं चोरलं, जुगारात २५ लाख जिंकले, पण सेकंड हॅड मोबाईलच्या नादात अडकला चोर  
7
३२ लाखांची FD, संपत्तीची हाव... दत्तक मुलाचं आईसोबत भयंकर कृत्य, आता मिळाली शिक्षा
8
मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवसानिमित्त भाजपातर्फे आयोजित रक्तदान कार्यक्रमाने रचले २ विश्वविक्रम
9
भारत-नेपाळ सीमेवर एसएसबी जवानांशी झटापट; गोळीबारात जवानाच्या डोक्यात लागली गोळी, हल्लेखोरही जखमी
10
'आम्हाला चुकीचे मृतदेह', अहमदाबाद विमान अपघाताबाबत ब्रिटिश कुटुंबांचा धक्कादायक दावा
11
बॉयफ्रेंडला धोका, उद्योगपतीशी लग्न... आता पतीपासून वेगळी राहते 'ही' बिग बॉस विनर?
12
Maharashtra Rain Alert: मुंबई, पुण्यासह 'या' जिल्ह्यांना अतिवृष्टीचा इशारा, हवामान विभागाकडून रेड अलर्ट
13
पहलगाम हल्ला अन् ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेची तारीख ठरली; पीएम मोदीही उपस्थित राहणार
14
पहिल्यांदाच शेअर वाटायची तयारी, दोन दिवसांत 40% हून अधिक वधारला हा शेअर, केलं मालामाल!
15
कल्याण मारहाण प्रकरण: मराठी तरूणीला मारणारा गोकुळ झा, भाऊ रणजीत झा यांना २ दिवसांची पोलिस कोठडी
16
मुंबई लोकलचा प्रश्न दिल्लीत; काँग्रेस खासदाराने लोकसभेत मांडली जीवघेण्या प्रवासाची व्यथा
17
सुसाट स्पोर्ट्स बाईक दुभाजकावर आदळली, भीषण अपघातात भाजपा मंत्र्याचा पुतण्या मृत्युमुखी
18
नवी मुंबई: तरुणीने प्रेमसंबंध तोडले अन् तो नैराश्यामध्ये गेला, नंतर थेट घरावरच...
19
Nana Patekar : नाना पाटेकर यांना होता आणखी एक मुलगा, अडीच वर्षांचा असताना झालं निधन
20
'झिरो फिगर'च्या होण्यासाठी केलं खतरनाक डाएटिंग! तरुणी मरता मरता वाचली; भयानकच अनुभव..

कृषी विद्यापीठात साडेपाचशे औषध वनस्पती

By admin | Updated: August 6, 2014 01:00 IST

खंडसिंग या दुर्मीळ वनस्पतीपासून ते डासांना पळवून लावण्यासाठी सिट्रोनेला गुणधर्म असलेल्या सुगंधी गवताचा समावेश आहे.

अकोला: डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या नागार्जुन औषधी उद्यानात सर्पदंशावर उपचार करणार्‍या खंडसिंग या दुर्मीळ वनस्पतीपासून ते डासांना पळवून लावण्यासाठी सिट्रोनेला गुणधर्म असलेल्या सुगंधी गवताचा समावेश आहे. पारंपरिक पिकांसोबतच औषधी वनस्पतींची लावगड करणे उपयुक्त असल्याने कृषी विद्यापीठाच्यावतीने विदर्भातील शेतकर्‍यांना त्याबाबत मार्गदर्शन केले जात आहे. विद्यापीठातील नागार्जुन उद्यानात साडेपाचशेपेक्षा जास्त सुगंधी औषधी वनस्पतींचे जतन करण्यात आले असूून, ३४0 औषधी वनस्पतींची एनबीपीजीआरकडे (नॅशनल ब्युरो ऑफ जेनेटिक प्लँट रिसोर्स) अधिकृत नोंदणी करण्यात आली आहे. या औषधी वनस्पतीचा व्यावसायिक उपयोग करायचा असेल, तर कृषी विद्यापीठांशी करार केल्यानंतरच त्याची अनुमती दिली जाणार आहे. यात सिम्बोपोगम या सुगंधी गवतवर्गीयामध्ये तिखाडी, गवती चहा व जावा सिट्रोनेलाचा समावेश आहे. सिट्रोनेला गवतामध्ये डासांना पळवून लावण्याचे गुणधर्म आहेत. म्हणूनच काही खासगी कंपन्यांनी डासांपासून संरक्षण करण्यासाठी अंगाला लावणारे मलम या सुगंधी गवतापासून तयार केले आहे. सौंदर्य प्रसाधनांसाठीही या गवताचा सर्वाधिक वापर केला जात असून, आंघोळीचे साबण, अंगाला लावायची पावडर, डिओड्रंट तसेच परफ्युममध्ये याच गवतवर्गीय वनस्पतीचा वापर केला जात आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात भारतीय सुगंधी औषधीला मोठी मागणी असून, इतर देशाच्या तुलनेत भारताच्या सुगंधी वनस्पतीचा तिसरा क्रमांक आहे. विदर्भातील शेतकर्‍यांनी पारंपरिक शेतीसोबतच या वनस्पती शेतीचा अवलंब करावा, यासाठी कृषी विद्यापीठ मार्गदर्शन करीत असून, त्यासाठी कमीत कमी एक टन क्षमतेचा प्रकल्प टाकण्याची गरज आहे. या प्रकल्पाला दररोज एक टन गवताची गरज असल्याने २५ हेक्टरवर या गवताची लागवड करावी लागते. या एक टन गवतापासून १0 किलो तेल मिळते. प्रती किलो ३६0 रुपये ही या तेलाची बाजारपेठेतील किंमत आहे. तेल काढल्यानंतर उरलेल्या गवताचा वापर सौंदर्य प्रसाधनासाठी केला जातो.