अकोला : कृषी विद्यापीठाने विकसित केलेल्या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केल्यामुळे विदर्भातील शेती विकासाला चालना मिळाली आहे. म्हणूनच या शाश्वत तंत्रज्ञानाला शेतकर्यांच्या शेतात नेण्याची गरज असल्याचे प्रतिपादन डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. रविप्रकाश दाणी यांनी केले. कृषी विद्यापीठाने आयोजित केलेल्या शिवारफेरीदरम्यान, शेतकर्यांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते.कृषी विद्यापीठाचा स्थापना दिवस प्रत्येक वर्षी शेतकरी शिवारफेरीने साजरा करण्यात येतो. १९ आक्टोबरपासून शिवारफेरीला सुरू वात झाली आहे. आतापर्यंत या शिवारफेरीत १४00 शेतकर्यांनी सहभाग नोंदवून कृषी विद्यापीठाने विकसित केलेल्या तंत्रज्ञानाची माहिती जाणून घेतली. शिवारफेरीच्या दुसर्या दिवशी सोमवारी विदर्भातील वाशिम, अमरावती, यवतमाळ व नागपूर जिल्हय़ातील महिला-पुरुष शेतकर्यांनी शिवारफेरीत सहभाग घेतला.या शेतकर्यांनी कापूस संशोधन प्रक्षेत्रावरील कापसाचे विविध व उन्नत वाण, धागा, लांबीच्या प्रकारानुसार कापसाचे देशी वाण आदींची माहिती शास्त्रज्ञांकडून जाणून घेतली. कापसावर येणारी पांढरी माशी, वातावरणात होणार्या बदलामुळे होणारे विविध रोग, बोंडगळ इत्यादी शेतकर्यांच्या शंकांचे निरसन शास्त्रज्ञांनी केले. विदर्भात बहुतांश कोरडवाहू शेती असल्याने या विद्यापीठात कोरडवाहू संशोधन प्रक्षेत्राचा विकास करण्यात आला आहे. या प्रक्षेत्रावरील विविध आंतरपीक पद्धती,एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन, पायडल पंपाद्वारे शेततळय़ातून करण्यात येणारे संरक्षित ओलित आदी मॉडेल ठेवण्यात आले आहेत. कमी पाण्यात चांगली शेती कशी करण्यात येते, हे प्रात्यक्षिक शेतकर्यांनी बघितले. ऊस संशोधन केंद्राच्या प्रक्षेत्रावर ऊस या पिकात आंतरपीक व पट्टा पीक पद्धतीचा प्रयोग या कृषी विद्यापीठाने केला आहे. या प्रयोगाची माहिती शास्त्रज्ञांनी शेतकर्यांना दिली. कृषी विद्यापीठाने विकसित केलेल्या विविध तेलबिया वाणाची सर्वत्र मागणी वाढली आहे. यातील गुलाबी रंगाची करडई या वाणाची विस्तृत माहिती शेतकर्यांनी जाणून घेतली.
शाश्वत तंत्रज्ञानामुळे शेती विकास - आर.जी. दाणी
By admin | Updated: October 21, 2014 00:30 IST