शहरं
Join us  
Trending Stories
1
"गुजरातमधून तडीपार केलेला माणूस हा..."; अमित शाहांना शरद पवारांचे प्रत्युत्तर
2
जम्मू-काश्मीरच्या कुपवाडामध्ये सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक, ३ जवान जखमी
3
"राज ठाकरेंची भूमिका प्रेरणादायी अन् रोखठोक..."; अभिनेता सयाजी शिंदेंनी केलं कौतुक
4
बेलापुरमध्ये तीन मजली इमारत कोसळली; दोघांना बाहेर काढण्यात यश, बचावकार्य सुरु
5
भाजपावर भडकल्या ममता बॅनर्जी, नीती आयोग हटवण्याची मागणी ; "हे तुकडे तुकडे मंच...."
6
LIC Scheme for Daughter: ₹३४४७ च्या प्रीमिअमवर मिळणार ₹२२.५ लाख; टॅक्सही वाचेल आणि अन्य बेनिफिट्सही
7
पॅरिस ऑलिम्पिकची रंगतदार सुरुवात; ४ तासांच्या सोहळ्यात सिंधू-अचंता यांनी केले भारताचे नेतृत्व
8
सुनेत्रा, अजित पवार यांची अडचण वाढणार; शिखर बँक घोटाळ्याच्या क्लोजर रिपोर्टविरोधात ५० याचिका करणार
9
आजचे राशीभविष्य, २७ जुलै २०२४ : मेषसाठी गुंवणूकीतून फारसा लाभ नाही
10
BB Marathi 5: 'बिग बॉस मराठी'च्या घरात येणार सुरांचा बादशहा, रोहित राऊत की अभिजीत सावंत? तुम्हीच ओळखा
11
‘लाडकी बहीण’ला दादांच्या खात्याचा आक्षेप; याेजनेवर चिंता केली व्यक्त
12
शहरे मृत्युशय्येवर! निम्मा महाराष्ट्र मुंबई, पुण्यात वसत असेल तर 'बुडणारच'
13
'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम अभिनेत्याचं आणखी एक स्वप्न झालं पूर्ण, आधी मुंबईत घर आता खरेदी केली महागडी कार
14
आठ दिवसांत सोने ५, चांदी ११ हजारांनी गडगडली
15
रिटर्न भरणे होणार ‘बाएं हात का खेल...’; ६ महिन्यांत कायदा येणार नव्या स्वरूपात
16
ऑलिम्पिकपूर्वीच रेल्वे नेटवर्कवर हल्ला; फ्रान्समध्ये खळबळ; लाखाे प्रवासी खाेळंबले
17
...म्हणून दोषसिद्धीला स्थगिती होती गरजेची; केदार लढवू शकत नाहीत विधानसभा निवडणूक
18
कोल्हापुरात विळखा, सोलापूरला इशारा; राधानगरी धरणाचे पाच दरवाजे खुले
19
कोर्ट म्हणाले, ही कसली लोकशाही?
20
नोकरी करणाऱ्या जोडप्यांची मुले बोलेनात! हातातील मोबाइल दूर ठेवून त्यांच्याशी बोला

जिल्ह्यात पाच हजारांवर अंगणवाडी सेविकांना मिळणार स्मार्ट मोबाइल; संपानंतर शासनाचा निर्णय

By चंद्रकांत शेळके | Published: February 13, 2024 4:09 PM

विविध अहवाल पाठवण्यात येणार वेग; रेकाॅर्ड ठेवणेही सोपे

अहमदनगर : राज्यात ५३ दिवसांपासून अंगणवाडी सेविकांच्या संपावर तोडगा निघाला आहे. याशिवाय तांत्रिक कामासाठी अंगणवाडी सेविकांना स्मार्ट मोबाइल देण्याची मागणीही शासनाने मान्य केली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील ५ हजार १८१ अंगणवाडी सेविकांना हे मोबाइल मिळणार आहेत.

एकात्मिक बालविकास प्रकल्पांतर्गत प्रत्येक गावात अंगणवाड्यांचे कामकाज चालते. मोठ्या अंगणवाड्यांच्या ठिकाणी सेविका आणि मदतनीस कार्यरत आहेत, तर मिनी अंगणवाडीत सेविका हे एकच पद आहे. अंगणवाडीत सहा वर्षांपर्यंतच्या बालकांना शिकवले जाते, तसेच सेविकांकडून शासकीय अनेक कामे केली जातात. यासाठी सेविकांना शासनाने मोबाइल दिला होता. यावर माहिती भरली जाते. बालकाचे वजन, उंची, पोषण आहार, गृहभेटी, उपस्थिती आदी प्रकारची माहिती भरण्यात येते; पण अनेक वर्षे वापरात असल्याने जुना मोबाइल वापराला अडचणी येत होत्या. त्यामुळे शासनाने आता स्मार्ट मोबाइल देण्याचा निर्णय घेतला आहे. लवकरच हे मोबाइल अंगणवाडी सेविकांना मिळणार आहेत.अंगणवाडी सेविकांना अनेक कामेअंगणवाडी सेविकांना मुलांना शिकवणे, पोषण आहार, गर्भवती माता, बालकाचे वजन घेणे, लसीकरण आदी कामे करावी लागतात, तसेच शासनाच्या आदेशानंतर सर्वेक्षणाचीही जबाबदार असते. यामुळे सेविकांवर सतत कामाचा ताण असतो.यामुळे अंगणवाडी संघटनांच्या वतीने वारंवार आंदोलने होत असतात.अहवाल देणे होईल सोपेअंगणवाडी सेविकांना शासनाकडून देण्यात येणाऱ्या स्मार्ट मोबाइलमध्ये अनेक ॲप समाविष्ट करून देण्यात येणार आहेत. या माध्यमातून अंगणवाडी सेविकांना काम करणे सोपे होणार आहे. कारण अंगणवाडी सेविकांना केलेल्या कामाचा अहवाल द्यावा लागतो. नवीन मोबाइल सेविकांसाठी फायदेशीर ठरतील, असे सांगण्यात येत आहे.शहरी अन् ग्रामीण सेविकांनाही लाभ...जिल्ह्यात शहरासह प्रत्येक गावांत अंगणवाड्या कार्यरत आहेत. नगर जिल्ह्यात लहान-मोठ्या मिळून ५ हजार ३७५अंगणवाड्या असून त्यात ४ हजार ३९७ अंगणवाडी सेविका, तर ७८४ मिनी अंगणवाडी सेविका अशा एकूण ५ हजार १८१ सेविका कार्यरत आहेत.

जुने मोबाइल खराब झाले होते. अंगणवाडी सेविकांनी विविध मागण्यांसाठी नुकताच संप केला, तसेच न्यायालयातही दाद मागावी लागली. त्यानंतर आता नवीन मोबाइल देण्याचे शासनाने मान्य केले आहे. त्याचे वितरण तातडीने व्हावे.- जीवन सुरडे, जिल्हा सरचिटणीस, अंगणवाडी युनियन

टॅग्स :AhmednagarअहमदनगरMobileमोबाइल