अहमदनगर : जिल्हा परिषद अध्यक्ष विठ्ठलराव लंघे यांच्या तालुक्यातील ज्येष्ठ जिल्हा परिषद सदस्य तुकाराम शेंडे यांना सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता पालवे यांनी अपमानास्पद वागणूक दिली असल्याचा आरोप केला आहे. त्यांच्या गटातील विकासकामांचे बील पास करण्यासाठी पालवे आर्थिक मागणी करत असून त्यांच्या संपत्तीची चौकशीची व्हावी, असे शेंडी यांचे म्हणणे आहे.दोन दिवसांपूर्वी सदस्य शेंडे कार्यकारी अभियंता पालवे यांच्या कार्यालयात विकास कामांची बिले पास करण्यासाठी गेले होते. त्यावेळी पालवे यांनी त्यांना अपमानास्पद वागणूक दिली. तसेच माळीचिंचोरे येथील विकास कामाचे बील काढण्यास सुरूवातीला विरोध केला. मात्र, जिल्हा परिषद अध्यक्ष लंघे यांना फोन केला असता पालवे यांनी रागारागाने बील पास केले असल्याचा आरोप शेंडे यांनी केला आहे. यापूर्वी त्यांना विकास कामांचे बील मंजूर करण्यासाठी दहा हजार रुपये दिला असल्याचा दावा शेंडे यांनी केला आहे. यामुळे पालवे यांच्या संपत्तीच्या चौकशीची मागणी यावेळी करण्यात आली.(्प्रतिनिधी)जिल्हा परिषद सदस्यांशी गैरवर्तन करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई होणे आवश्यक आहे. पालवे यांना मुख्य कार्यकारी अधिकारी शैलेश नवाल यांनी सक्तीच्या रजेवर पाठवावे. -राजेंद्र फाळके, जिल्हा परिषद सदस्य.
जि.प. सदस्याकडे केली पैशाची मागणी
By admin | Updated: June 22, 2014 00:20 IST