कोतूळ : येथील गणपती मंदिराच्या मागे नंदा नावाची पस्तीस वर्षांची विवाहित मनोरुग्ण तरुणी वीस दिवसांपासून आग ओकणाऱ्या उन्हात उभी आहे.
गतवर्षी मार्च महिन्यात नंदा नावाची पस्तीस वर्षांची विवाहित काहीशी मनोरुग्ण तरुणी कोतुळात आली. ती कोतूळ परिसरातील पळसुंदे गावातील असल्याचे ती सांगते. तिला गावातील लोकांनी कपडे जेवण दिले, त्यावर ती वर्षभर रेशन दुकान, मुख्य चौक, दत्त मंदिर या परिसरात रस्त्यावर राहू लागली.
गेल्या वीस ते पंचवीस दिवसांत कोरोना रुग्ण वाढल्याने, त्यात लाॅकडाऊनचे कडक नियम असल्याने, तिच्याजवळ कोणी जात नाही. तिने वरद विनायक गणेश मंदिराच्या आवारात आपले बस्तान मांडले. मात्र, भर उन्हात ती दिवसभर उभीच असते.