तिसगाव : तालुक्यातील मिरी येथील श्री दत्तकृपा कोविड सेंटरला जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी परीक्षित यादव यांनी भेट दिली. याप्रसंगी त्यांनी रुग्णांना देण्यात येणाऱ्या सोयी-सुविधांबद्दल माहिती घेतली. प्रत्यक्ष रुग्णांबरोबर संवाद साधत कोविड मंदिराकडून देण्यात येणाऱ्या सुविधांची माहिती घेतली. पंचायत समिती सदस्य राहुल गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू करण्यात आलेल्या या कोविड सेंटरच्या आरोग्यदायी कार्याबद्दल परीक्षित यादव यांनी समाधान व्यक्त केले. याप्रसंगी राहुल गवळी, गटविकास अधिकारी शीतल खिंडे, विस्ताराधिकारी प्रशांत तोरवणे, सरपंच आदिनाथ सोलाट, ग्रामपंचायत सदस्य आदिनाथ पाटील झाडे, राजू शेख, ज्ञानदेव वाव्हळ, गणेश वाघ, बबलू डहाळे, ग्रामविकास अधिकारी राजेंद्र साखरे, डॉ. फडतरे, डॉ. अकोलकर, आरोग्य सेविका शेंडे आदी उपस्थित होते.
मिरीतील कोविड सेंटरला यादव यांची भेट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2021 04:17 IST