शहरं
Join us  
Trending Stories
1
सात दिवस आधीच विठ्ठलाच्या दर्शन रांगेत ५० हजार भाविक; रांग किती किमीपर्यंत लागली...
2
सारथी संस्थेतील पायऱ्यांवरील पाणी मुरत नाही; अजित पवारांच्या नाराजीवर पीडब्ल्यूडीची धावाधाव
3
'वेडेपणा अन् विनाशकारी निर्णय...', ट्रम्प यांच्या 'बिग ब्यूटीफुल' विधेयकावर मस्क यांची जहरी टीका
4
"४० वर्षांचा संसार मोडून तिने..." महुआ मोईत्रा आणि कल्याण बॅनर्जींमध्ये जुंपली, म्हणाले, "मला उपदेश देतेय"
5
"मराठीचे मारेकरी, हिंदीचे सेवेकरी" मनसेचा फडणवीसांना टोला, शेअर केला 'असा' फोटो!
6
षटकार ठोकला आणि मैदानात पडला, हृदयविकाराच्या झटक्याने फलंदाजाचा मृत्यू  
7
Jagannath Yatra: जगन्नाथ यात्रेला गालबोट! पुरीतील गुंडीचा मंदिराजवळ चेंगराचेंगरी, तीन भाविकांचा मृत्यू, १० जखमी
8
मुलांना वाढवणं सोप्प नाही! जन्मापासून कॉलेजपर्यंतच्या खर्चाचा आकडा वाचून डोळे होतील पांढरे
9
भारत-पाकिस्तान सीमेवर दोन मृतदेह आढळले, जवळच पडले होते पाकिस्तानी सिम, ओळखपत्रे
10
कचऱ्यात फेकलेल्या तिकीटावर लॉटरी लागली, त्यातून आणखी तिकीटे घेतली, ६६ लाख जिंकली...
11
बांगलादेशमध्ये हिंदू तरुणीवर घरात घुसून बलात्कार, व्हिडिओही बनवला, बीएनपी नेत्यावर आरोप 
12
पवार कुटुंबात यंदा दोन विवाहसोहळे! युगेंद्र पवारांचेही ठरले, सुप्रिया सुळेंनी होणाऱ्या सुनेचे नाव सांगितले...
13
पेन्शनधारकांसाठी आनंदाची बातमी! १५ नव्हे १२ वर्षांतच मिळणार पूर्ण पेन्शन, केंद्र सरकार बदलणार नियम?
14
तरण्या-ताठ्या मुलामुलींचं हृदय का होतंय म्हातारं? शेफाली जरीवालाच्या निधनामुळे पुन्हा चर्चा
15
साप्ताहिक राशीभविष्य: काहींना नवीन संधी मिळेल, 'या' राशींना अचानक धनलाभ होईल
16
Ajit Pawar: हिंदी सक्ती ते ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चांपर्यंत; अजित पवार स्पष्टच बोलले!
17
२ लग्न करणाऱ्या 'कांटा लगा गर्ल'ची कोट्यवधींची संपत्ती कोणाला मिळणार? कोण आहे कायदेशीर वारसदार?
18
हरियाणाच्या महिला आयपीएस अधिकारी स्मिती चौधरी यांचे नाशिकमध्ये निधन; पती महाराष्ट्र पोलिसमध्ये अधिकारी
19
"...तर खूप वाईट परिणाम होतील’’, काश्मीर राग आळवत आसिम मुनीरची भारताला पुन्हा धमकी
20
Uttarakhand Cloudburst: उत्तराखंडमध्ये पावसाचा कहर, यमुनोत्री मार्गावर ढगफुटी; अनेक कामगार बेपत्ता, बचावकार्य सुरू

दीड लाखाची लाच घेताना सहायक अभियंत्याला अटक

By admin | Updated: May 5, 2016 00:02 IST

श्रीरामपूर : रस्त्याच्या कामाचे बिल रेकॉर्ड करण्यासाठी दीड लाख रुपयांची लाच घेताना श्रीरामपूर पंचायत समितीच्या बांधकाम उपविभागातील सहायक अभियंता अशोक केशव मुंडे (वय ५०, रा. औरंगाबाद)

श्रीरामपूर : रस्त्याच्या कामाचे बिल रेकॉर्ड करण्यासाठी दीड लाख रुपयांची लाच घेताना श्रीरामपूर पंचायत समितीच्या बांधकाम उपविभागातील सहायक अभियंता अशोक केशव मुंडे (वय ५०, रा. औरंगाबाद) यास बुधवारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडून अटक केली.श्रीरामपूर रेल्वे स्थानकासमोरील अहमदनगर जिल्हा परिषदेच्या विश्रामगृहात तक्रारदार ठेकेदार मतीन शेख यांच्याकडून दुपारी २ वाजेच्या सुमारास १ लाख ४८ हजार २०० रुपयांची रक्कम स्वीकारताना लावलेल्या सापळ्यात तो अलगद अडकला. पैसे स्वीकारताच त्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने लगेचच पकडले. मुंडे यांना लाचेची रक्कम देण्याची तयारी नसल्याने तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अहमदनगर येथील कार्यालयाशी संपर्क साधून त्यांच्याकडे याबाबत तक्रार नोंदविली होती. त्यानुसार मुंडे याला १ लाख ४८ हजार रुपयांची लाच स्वीकारताना जिल्हा परिषदेच्या विश्रामगृहातच रंगेहाथ पकडण्यात आले. सायंकाळी उशिरापर्यंत श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपअधीक्षक इरफान शेख, पोलीस निरीक्षक चंद्रशेखर सावंत, हेडकाँस्टेबल सुनील पवार, वसंत वाव्हळ, काशीनाथ खराडे, पोलीस नाईक प्रमोद जरे, राजेंद्र सावंत, तनवीर शेख, नितीन दराडे, चालक पोलीस हेडकाँस्टेबल अंबादास हुलगे यांनी ही कारवाई केली. (प्रतिनिधी)कामाची बिले काढण्यासाठी मागितली लाचअहमदनगर जिल्हा परिषदेचे नोंदणीकृत ठेकेदार असलेल्या मतीन शेख यांनी श्रीरामपूर पंचायत समितीच्या बांधकाम उपविभागांतर्गत गोंडेगाव-उंदिरगाव-खानापूर रस्त्याचे काम पूर्ण केले होते. या कामाचे बिल मुंडे याने काढले असून ही रक्कम ठेकेदारास मिळाली आहे. या कामाचे सीलकोट, मजबुतीकरण, मंजूर रस्त्याच्या बांधकामाच्या मिळालेल्या बिलाच्या मोबदल्यापोटी तसेच उर्वरित कामाचे बिल रेकॉर्ड करण्यासाठी मुंडे याने तक्रारदाराकडे मंजूर बिलाच्या ५ टक्केप्रमाणे दीड लाख रुपयांची मागणी केली होती.