शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपामध्ये जाणार का? एकनाथ खडसे म्हणाले, “मी आजही RSSचा स्वयंसेवक आहे, गिरीश महाजन...”
2
ENG vs IND : आता अनुभवी KL राहुलसह कॅप्टन शुबमन गिलवर मोठी जबाबदारी
3
अमेरिकेच्या हल्ल्याला इराण कसे देणार प्रत्युत्तर? आताच्या घडीला खामेनी यांच्याकडे ३ पर्याय
4
अमेरिकेच्या इराणवरील हल्ल्यावर फारूक अब्दुल्लांचे विधान; म्हणाले, “आज जागे झाले नाही तर...”
5
ENG vs IND : जसप्रीत बुमराहचा 'पंजा'! या ३ चुकांमुळे लीड्स कसोटीत टीम इंडियानं गमावली मोठ्या आघाडीची संधी
6
साप्ताहिक राशीभविष्य: ५ राशींना सर्वोत्तम, पदोन्नती योग; बंपर लाभास अनुकूल काळ, शुभ तेच घडेल!
7
पावसाळ्यातही सुरू राहणार नक्षलविरोधी मोहीम; आत्मसमर्पण करा, अन्यथा...शाहांचा अल्टिमेटम
8
अमेरिकेनं इराणवर ज्या B-२ स्टिल्थ बॉम्बर्सनं हल्ला केला त्याची किंमत माहित्येय? तासाला किती खर्च येतो? जाणून थक्क व्हाल
9
Ashadhi Wari : दिवे घाटाची अवघड वाट पार करीत माउलींचा पालखी सोहळा कऱ्हेकाठी विसावला
10
CM देवेंद्र फडणवीसांना पाठवली कायदेशीर नोटीस, असीम सरोदे यांनी दिली माहिती; नेमके प्रकरण काय?
11
"...इराणला आपली अण्वस्त्रे देण्यास तयार!"; रशियाच्या माजी राष्ट्रपतींचा मोठा दावा; उद्या पुतीन यांची खास बैठक
12
अमेरिकेनं इराणवर चालवलं 'मिडनाइट हॅमर', केला ऑपरेशनच्या नावाचा खुलास; म्हणाले, ट्रम्प बोलें तो...!
13
१२५ लढाऊ विमाने, त्यात ७ बी२ बॉम्बर...! इराणला फसविले, पेंटागॉनने सांगितले अणुकेंद्रांवर कसा हल्ला चढविला...
14
ENG vs IND : कायद्यात राहून फायद्यात! जड्डू-साई सुदर्शन जोडीनं रिले कॅचसह लुटली मैफिल (VIDEO)
15
“८ वेळा निवडणुका जिंकलो, आता थांबण्याचा विचार करावासा वाटतो”; भास्कर जाधवांचे सूचक विधान
16
इराण तीन आठवड्यांत ९ अणुबॉम्ब बनवू शकला असता; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर फोर्डोचा सॅटेलाईट फोटो आला...
17
“वारीमुळे रस्ता जाम होतो, आम्ही तक्रार केली नाही”; अबू आझमींचे विधान, CM फडणवीसांचे उत्तर
18
रोहित-विराट वनडे वर्ल्ड कप खेळणं 'मुश्किल'; गांगुलीनं बोलून दाखवली मनातली गोष्ट
19
इस्रायल-इराण युद्धात आता अमेरिकेनंतर होणार रशियाची एन्ट्री? अराघची घेणार पुतिन यांची भेट, म्हणाले...
20
शिंदेंनंतर आता भाजपाने डाव टाकला; शेकडो पदाधिकारी, माजी नगरसेवकांचा ठाकरे गटाला जय महाराष्ट्र

भंडारदऱ्यातून विद्युत निर्मितीसाठी पाणी सोडले

By admin | Updated: July 10, 2016 00:35 IST

राजूर : अकोले तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यात शनिवारी दिवसभर जोरदार पावसाच्या सरी बरसत असल्यामुळे सायंकाळी ६ वाजता भंडारदरा धरण २५ टक्के भरले.

राजूर : अकोले तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यात शनिवारी दिवसभर जोरदार पावसाच्या सरी बरसत असल्यामुळे सायंकाळी ६ वाजता भंडारदरा धरण २५ टक्के भरले. मुळा धरणाच्या पाणलोटातही होत असलेल्या मुसळधार पावसामुळे मुळा नदी दुथडी भरून वाहू लागली आहे. दरम्यान, भंडारदरा धरणातून दुपारी पावणे बारा वाजता विद्युत निर्मितीसाठी ७५९ क्युसेक वेगाने पाणी सोडण्यास सुरूवात झाली.दोन दिवसांच्या विश्रांतीनंतर दोन्ही धरणांच्या पाणलोटात शुक्रवारी मध्यरात्रीनंतर पावसाने जोरदार मुसंडी मारली. शनिवारी दिवसभर तालुक्याच्या सवर्दूर भागांत पावसाचा जोर चांगलाच वाढलेला होता. आदिवासी पट्टयात होत असलेल्या मुसळधार पावसामुळे भातखाचरे तुडुंब भरलेली असून ओढे-नालेही दुथडी भरून वाहू लागले आहेत. भंडारदरा धरणाच्या पाणलोटात दिवसभर धो- धो सरी बरसल्या. भंडारदरा येथे बारा तासांत तब्बल ६४ मि.मी. पावसाची नोंद झाली, तर धरणात ४२९ दशलक्ष घनफूट नवीन पाण्याची आवक होत धरण २५ टक्केहून अधिक भरले. म्हणजेच धरणातील पाणीसाठा सायंकाळी ६ वाजता २ हजार ८८८ दलघफू झाला होता. कळसूबाई शिखराच्या परिसरातही जोरदार सरी बरसत असल्यामुळे ओढ्या-नाल्यांना पूर आला आहे. वाकी येथील प्रकल्पावरून १ हजार ५७४ क्युसेक वेगाने पाणी नदीपात्रात पडत आहे. त्यामुळे कृष्णवंती ही उपनदीही दुथडी भरून वाहू लागली आहे. यामुळे निळवंडे धरणातही पाण्याची आवक वाढत असून सायंकाळी ६ वाजता या धरणातील पाणीसाठा ६८३ दलघफू इतका झाला होता. हरिचंद्र गडाच्या परिसरात मुसळधार पावसाच्या सरी बरसत होत्या. या खोऱ्यातील १८२ द.ल.घ.फू क्षमतेचा कोथळे येथील लघुपाटबंधारे प्रकल्प सकाळी ६ वाजता भरून वाहू लागला. या खोऱ्यातील आंबीत, बलठण, शिरपुंजे या अगोदरच भरले आहेत. या परिसरात होत असलेल्या पावसामुळे मुळेच्या विसर्गातही मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे.राजूर परिसरातही दिवसभर जोरदार पावसाच्या सरी बरसल्या, यामुळे डोंगररांगाही ओल्याचिंब झाल्या असून प्रथमच डोंगरमाथ्यावरून आता छोटे छोटे धबधबे प्रवाही होऊ लागले आहेत. सकाळी ६ वाजता संपलेल्या २४ तासांत नोंद झालेला पाऊस असा - घाटघर ७५ मि.मी., रतनवाडी ६६ मि.मी., पांजरे ४५ मि.मी., वाकी ३६ मि. मी. (वार्ताहर)