शहरं
Join us  
Trending Stories
1
Uttarakhand Cloudburst: उत्तराखंडमध्ये पावसाचा कहर, यमुनोत्री मार्गावर ढगफुटी; अनेक कामगार बेपत्ता, बचावकार्य सुरू
2
सिंधू जल वाटप करारासंदर्भात भारताने आंतरराष्ट्रीय लवादाचा निर्णय फेटाळला; पाकिस्तानकडून मात्र निर्णयाचे स्वागत
3
१५-६४ वयोगटातील जगातील ६% लोकसंख्या ड्रग्जच्या विळख्यात, कोकेन ‘श्रीमंतांची फॅशन’
4
वीज प्रति युनिट १ ते १.३० रुपयांनी महागणार; महाराष्ट्र वीज ग्राहक संघटनेचा दावा
5
अंतराळातून भारताचे तेजस्वी दर्शन; दररोज १६ सूर्योदय, १६ सूर्यास्त पाहातो; अंतराळवीर शुभांशू यांना पंतप्रधानांचा व्हिडीओ कॉल
6
लग्नाचं आमिष दाखवून त्याने ५ वर्षांपासून…, RCBच्या स्टार खेळाडूवर शारीरिक शोषणाचा गंभीर आरोप
7
"तुझ्या कुंडलीत आकस्मिक मृत्यू...", शेफाली जरीवालाबाबत अभिनेत्याने केलेली भविष्यवाणी खरी ठरली
8
आजचे राशीभविष्य - २८ जून २०२५, महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा, प्रकृतीचा त्रास जाणवेल, आज 'या' राशींनी घ्या काळजी
9
शक्ती कायद्याची एक वर्षानंतर झाली आठवण; केंद्राचे पत्र जुलै २०२४ मध्ये; राज्याने आता नेमली समिती
10
Panvel Crime News: प्रेमसंबंधातून जन्मलेल्या बाळाला फुटपाथवर फेकलं; २४ तासाच्या आत आरोपींना अटक
11
उद्धव ठाकरेंकडून मराठीचा राजकीय वापर, त्रिभाषा सूत्राचा अहवाल स्वीकारणारेच आज विरोधात : फडणवीस
12
पतीचं निस्वार्थ प्रेम! शेफाली जरीवालाच्या अंत्यसंस्कारावेळी परागच्या 'त्या' कृतीने वेधलं लक्ष, व्हिडीओ पाहून डोळे पाणावतील
13
मोठी बातमी: विद्यार्थिनीचा लैंगिक छळ करणाऱ्या विजय पवार, प्रशांत खाटोकरला बीड पोलिसांनी ठोकल्या बेड्या
14
बाबासाहेबांना एकच संविधान अभिप्रेत असल्याने कलम ३७० हटवण्यावर मोहर
15
चुका सुधारणार की मारच खात राहणार?
16
दहशतवादी साकिब नाचनचे दिल्लीत निधन, सिमी, इसिससाठी काम; ‘तिहार’मध्ये बिघडली प्रकृती
17
दोन ठाकरे एकत्र येणार की निर्णयच बदलणार?
18
त्यांनी घरून मोबाइलवर केले मतदान, आपला नंबर कधी ?
19
रीलसाठी आयफोनची चोरी; फोनमालकाचा चिरला गळा
20
‘कांटा लगा’ फेम शेफालीचा मृत्यू कशामुळे?, प्रकृती बिघडली, रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच मृत्यू

कॅन्सरग्रस्त वृद्धेच्या मदतीसाठी ग्रामस्थांची धाव

By admin | Updated: November 28, 2014 01:14 IST

अहमदनगर : कॅन्सरग्रस्त आईला वाचविण्यासाठी मुलाची धडपड या आशयाखाली लोकमतने प्रसिद्ध केलेल्या वृत्ताची दखल घेत ग्रामस्थांनी तिच्या मदतीसाठी धाव घेतली असून,

अहमदनगर : कॅन्सरग्रस्त आईला वाचविण्यासाठी मुलाची धडपड या आशयाखाली लोकमतने प्रसिद्ध केलेल्या वृत्ताची दखल घेत ग्रामस्थांनी तिच्या मदतीसाठी धाव घेतली असून, कॅन्सरग्रस्त वृद्धेवर लोणीच्या प्रवरा ग्रामीण रूग्णालयात उपचार सुरू झाले आहेत.कामरगाव (ता. नगर) येथील सुंदराबाई रामचंद्र लष्करे (वय ६०) या कर्करोगाने पीडित आहेत. परंतु घरची आर्थिक स्थिती हलाखीची, पतीचे हरवलेले छत्र, जिथे रोजच्या दोन वेळेच्या जेवणाची भ्रांत तिचे उपचाराला पैसे कोठून येणार, त्यामुळे सुंदराबाई आजार अंगावर काढू लागल्या. परंतु मुलाला आईची ही स्थिती बघवत नव्हती. त्यामुळे मिळेल त्या मार्गाने मदतीसाठी मुलाचे प्रयत्न सुरू होते. ‘लोकमत’ने दि. २३ नोव्हेंबरच्या अंकात कॅन्सरग्रस्त वृद्धा व तिला वाचविण्यासाठी मुलाची सुरू असलेली धडपड यावर प्रकाश टाकत समाजाकडून मदतीचे आवाहन केले होते. त्याला प्रतिसाद देत कामरगावातीलच तुकाराम कातोरे समाजसेवा मित्रमंडळाने मदतीसाठी पुढाकार घेतला. तुकाराम कातोरे, संदीप लष्करे, कैलास झरेकर, सुनील चौधरी, सुखदेव वेताळ, सुदाम ठोकळ, भास्कर भुजबळ, राजेंद्र पोटे, शाम जाधव, सुखदेव ढवळे आदी ग्रामस्थांनी एकत्र येत २६ हजार रूपयांची मदत या कुटुंबाला दिली. याशिवाय बँक खात्यावर पाच हजारांची मदत जमा झाली आहे. यामुळे सुंदराबार्इंना लोणी येथील प्रवरा ग्रामीण रूग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले आहे.(प्रतिनिधी)