आरोपींमध्ये सद्दाम ऊर्फ बबलू राजू शेख (रा. रामगड, ता. श्रीरामपूर) व शहरातील जाफर करीम शेख (बजरंग चौक) यांचा समावेश आहे.
फरार आरोपी सद्दाम शेख याने २०१८ मध्ये तालुक्यातील आठवाडी येथे नासीर सलीम शेख याला लोखंडी गजाने मारहाण केली होती. याप्रकरणी नासीर यांनी शहर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला होता. तेव्हापासून सद्दाम हा फरार होता. बसस्थानकावर डिसेंबर २०२० मध्ये ज्योती गोविंद साबदे यांच्या पर्स चोरीप्रकरणी गुन्हा दाखल होता. या गुन्ह्याचा तपास सुरू असताना खबऱ्याकडून मिळालेल्या माहितीवरून जाफर हा मिळून आला. त्याच्यावर मनमाड व नाशिक पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत.
या कारवाईत उपनिरीक्षक समाधान सुरवडे, हवालदार जोसेफ साळवी, पंकज गोसावी, राहुल नरोडे, संतोष बडे, महेंद्र पवार, नितीन शिरसाठ, किशोर जाधव, संतोष परदेशी, सचिन बैसाणे आदींचा समावेश होता.