या तिघांसह त्यांच्या साथीदारांनी २३ एप्रिल रोजी मांजरसुंबा येथे भिंगार येथील दोघांची लूटमार केली होती. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. या घटनेनंतर स्थानिक गुन्हे शाखेने या टोळीतील दोघा आरोपींना अटक केली होती, तिघेजण मात्र फरार होते. अखेर पोलिसांनी या तिघांचाही शोध घेऊन त्यांना जेरबंद केले. अटक केलेल्या आरोपींविरोधात एमआयडीसी, राहुरी व सोनई पोलीस ठाण्यात दरोड्यासह गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक अनिल कटके यांच्या पथकाने या दरोडेखोरांना जेरबंद केले. या आरोपींकडून आणखी गुन्हे उघड होण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली असून आरोपींना पुढील कारवाईसाठी एमआयडीसी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
प्रवाशांची लूटमार करणारे तिघे दरोडेखोर जेरबंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2021 04:16 IST