तांबे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे, १८ वर्षांवरील सर्वांचे लसीकरण मोफत करण्याच्या घेतलेल्या निर्णयासाठी राज्यातील सर्व तरुणांच्या वतीने मी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात व संपूर्ण महाविकास आघाडी मंत्रिमंडळाचे आभार मानतो. राज्यात कोरोनाचे संकट गंभीर असून अनेक ठिकाणी ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण होत आहे. यावरून राजकारण होत आहे. या सर्व परिस्थितीवर सरकार अतिशय सक्षमपणे मार्ग काढत आहे. ऑक्सिजनच्या पुरवठ्याची तूट कमी करण्याकरिता कोरोना रुग्ण कमी करणे हे सर्वांसमोर एक आव्हान आहे. याकरिता प्रत्येकाने शासकीय नियम पाळा, काही आजारांची लक्षणे आढळली तर तातडीने वैद्यकीय अधिकाऱ्यांचा सल्ला घ्या. कोणीही निष्काळजीपणा करू नका. आपण सुरक्षित राहिलो तरच आपले कुटुंब सुरक्षित राहील. हा मानवावरील संकटाचा मोठा काळ आहे. यामध्ये सुरक्षितता हेच प्रभावी शस्त्र आहे. कोरोनाला रोखण्यासाठी लसीकरण अत्यंत महत्त्वाचे असून सर्वांनी लसीकरण करून घ्यावे. असे आवाहन देखील तांबे यांनी केले.
शक्य असलेल्यांनी मुख्यमंत्री मदत निधीत लसीची रक्कम दान करावी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2021 04:16 IST