......
वाळू तस्करांवर पोलिसांची कारवाई
अहमदनगर : श्रीगोंदा तालुक्यातील म्हसे गावाच्या शिवारातील घोड नदीपात्रात अवैध वाळूउपसा करणाऱ्या वाळू तस्करांविरोधात पोलिसांनी २७ एप्रिल रोजी कारवाई केली. या कारवाईत तीन ब्रास वाळू, एक ट्रक असा एकूण १० लाख ३० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी बेलवंडी पोलीस ठाण्यात पोलीस नाईक संतोष गोमसाळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून दत्ता बाळासाहेब बीडकर, विशाल पांडुरंग पाचारणे यांच्यासह एका व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी हेडकॉन्स्टेबल बारावकर हे पुढील तपास करत आहेत.
..........
मोटरसायकल चोरली
अहमदनगर: नेवासा तालुक्यातील पानसवाडी परिसरातील गोपाळपुर येथून चोरट्यांनी ४० हजार रुपये किमतीची मोटरसायकल चोरून नेली. ११ एप्रिल रोजी ही घटना घडली. याप्रकरणी सोनई पोलीस ठाण्यात नारायण नामदेव कराळे यांनी २७ एप्रिल रोजी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलीस नाईक थोरात हे पुढील तपास करत आहेत.
..........