शहरं
Join us  
Trending Stories
1
हैदराबाद गॅझेट आणि सातारा गॅझेट म्हणजे काय? मराठा आरक्षणाशी काय संबंध? जाणून घ्या...
2
मोठ्ठा विकेंड? ८ सप्टेंबरला ईदची सार्वजनिक सुट्टी मिळणार? आमदार असलम शेख यांची मागणी, मुख्यमंत्र्यांना पत्र
3
Big Breaking: ते तिघे आले नाहीत तर नाराजी तशीच राहणार; अखेर मनोज जरांगेंनी उपोषण सोडले
4
जगभरातील प्रेमी युगुलांना एकत्र आणणाऱ्या नेस्ले कंपनीच्या सीईओची नोकरी गेली; कर्मचाऱ्यासोबत प्रेमसंबंध भोवले
5
कन्नड अभिनेत्री रान्या राव हिला DRI ने ठोठावला 102 कोटी रुपयांचा दंड
6
Manoj Jarange Patil Maratha Morcha Live: सर्व मागण्या मान्य; मनोज जरांगे पाटील यांनी अखेर आपले उपोषण सोडले
7
'मराठा-कुणबी एक' जीआर काढण्यासंदर्भात काय म्हणालं सरकारचं शिष्टमंडळ? जरांगेंनी स्वतःच सांगितलं
8
तुमच्या ताकदीवर आपण जिंकलो, मनोज जरांगेंची घोषणा; वाचा, ८ मागण्या अन् ८ सरकारी आश्वासने कोणती?
9
टीम इंडियाला लवकरच मिळणार नवा Sponsor! या मंडळींसाठी BCCI नं लावली नो एन्ट्रीची पाटी
10
मुकेश अंबानींच्या कंपनीचा शेअर १०% नं वाढला, खरेदीसाठी गुंतवणूकदारांची झुंबड; आता ₹१९ वर आला
11
लग्नाच्या १७ वर्षांनंतर राहुल देशपांडेच्या संसाराचे सूर बिघडले, पत्नीपासून झाला विभक्त
12
चेन स्मोकर आहे किम जोंग उन! उत्तर कोरियाचा हुकूमशहा एका दिवसात किती सिगारेट ओढतो?
13
मराठा आरक्षणाबाबत हैदराबाद गॅझेटिअरवर पहिला GR प्रसिद्ध; वाचा जशाच्या तसा संपूर्ण शासन निर्णय
14
लाखोंचा खर्च टाळला, अवघ्या २ हजारांत केले लग्न; IAS युवराज अन् IPS मोनिका यांची प्रेम कहाणी
15
संतापजनक! २ मुलांची आई पडली १७ वर्षांच्या मुलाच्या प्रेमात, दोघंही झाले फरार; आता महिलेवर POCSO कारवाई!
16
जरांगेंचा होकार, पण जर जीआरमध्ये काही दगा फटका झाला तर...; मनोज जरांगेंचा राज्य सरकारला इशारा
17
"मला मावशीच्या मिठीतच शांतता मिळते"; पतीचं बोलणं मनाला लागलं, नवविवाहितेनं टोकाचं पाऊल उचललं!
18
रात्री ९ वाजेपर्यंत मुंबई खाली करतो, मराठ्यांची पोरं नाचत जातील, पण...; मनोज जरांगेंचा विखेंना शब्द
19
श्रीसंतची दुखापत अन् RR फ्रँचायझीचा ८२ लाखांचा नुकसान भरपाईचा दावा! विमा कंपनीची सर्वोच्च न्यायालयात धाव
20
Manoj Jarange: मनोज जरांगे आजच उपोषण सोडणार? हैदराबाद गॅझेटचा जीआर निघणार, सातारा गॅझेटीयरची जबाबदारी शिवेंद्रराजेंनी घेतली...

‘स्वराज्य’ सिंहगर्जनेचे शतक!

By admin | Updated: May 30, 2016 23:55 IST

योगेश गुंड अहमदनगर :‘स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच’, अशी सिंहगर्जना करून लोकमान्य टिळकांनी जुलमी ब्रिटिश राजवटीने पिचलेल्या भारतीयांच्या मनात

ऐतिहासिक घटना : नगरकरांनी जपल्या स्फूर्तिदायी आठवणीयोगेश गुंडअहमदनगर :‘स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच’, अशी सिंहगर्जना करून लोकमान्य टिळकांनी जुलमी ब्रिटिश राजवटीने पिचलेल्या भारतीयांच्या मनात स्वातंत्र्याचे स्फूलिंग चेतविले त्या ऐतिहासिक घटनेची मंगळवारी शतकपूर्ती होत आहे.३१ मे १९१६ रोजी भारताच्या स्वातंत्र्य लढ्याला बळ देण्यासाठी अहमदनगरमध्ये घेतलेल्या सभेत लोकमान्यांनी ही सिंहगर्जना केली होती. त्यानिमित्ताने अहमदनरचे नाव भारतीय स्वातंत्र्यलढ्याच्या इतिहासात अजरामर झाले. ही सभा ज्या ठिकाणी झाली तेथे आज इमारती उभ्या राहिल्या असल्या तरी नगरकरांनी त्या ठिकाणी टिळकांचा अर्धपुतळा उभारून व त्याखालील चौथऱ्यावर या ऐतिहासिक घटनेचा तपशील कोरून ती स्फूर्तिदायक आठवण ताजी ठेवली आहे.‘स्वराज्य’ या शब्दाविषयी ब्रिटिश सरकारला चीड असल्यानेच लोकमान्य टिळकांनी स्वराज्य ऐवजी होमरूल (स्वशासन) हा शब्दप्रयोग करण्याचे ठरवले होते. या चळवळीचा प्रचार व जनजागृतीसाठी टिळकांनी ३१ मे १९१६ रोजी येथील कापड बाजारातील ‘इमारत कंपनी’च्या वसाहतीच्या मैदानावर ही ऐतिहासिक सभा घेतली. तेव्हा टिळक युग ऐन भरात असल्याने त्यांच्याविषयी नगरकरांना मोठे आकर्षण होते. त्यामुळे सभेला नगरकरांनी प्रचंड गर्दी केली होती. नगरकरांचा अपूर्व उत्साह पाहूनच टिळकांनी या सभेत स्वराज्याची हाक दिली. त्यानंतर हीच घोषणा टिळकांची सिंहगर्जना बनली. १०० वर्षांपूर्वी मैदानात झालेल्या या सभेच्या ठिकाणी आज मोठ्या इमारती उभ्या राहिल्या आहेत. मात्र वसाहतीच्या प्रशासनाने टिळकांच्या सभेची स्मृती जतन राहावी म्हणून येथील कापड दुकानाच्या मागील बाजूस लोकमान्यांचा अर्धाकृती पुतळा उभारला आहे. त्यामुळे टिळकांच्या आठवणी आजही नगरकरांच्या मनात घर करून आहेत.टिळक हे या सभेसाठी ३१ मे व १ जून असे दोन दिवस नगरमध्ये मुक्कामी होते. नगरच्या आधी त्यांनी बेळगाव येथे सभा घेतली. त्यांच्या होमरूल चळवळीच्या दौऱ्यातील नगर व बेळगावच्या सभा देशभर गाजल्या. नगरची सभा चौकर नामक वकिलांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. नगरचे भाषण स्वराज्य याच विषयावर केंद्रित होते. होमरूल चळवळीचा त्यांचा दौरा नगरलाच संपल्याचे सांगण्यात येते, कारण नगरच्या सभेनंतर त्यांचे कुठे भाषण झाल्याचा उल्लेख सापडत नाही. नगरच्या सभेनंतर टिळकांचे चार वर्षांनी निधन झाले. --------------------नगरची सभा अन् राष्ट्रद्रोहाचा खटलालोकमान्य टिळकांचे नगरच्या सभेतील भाषण ब्रिटिश सरकारने आक्षेपार्ह असल्याचे ठरवून राष्ट्रद्रोहाखाली त्यांच्याकडून २० हजार रुपयांचा वैयक्तिक जातमुचलका आणि २० हजार रुपयांचे दोन जामीन मागितले. सरकारच्या या निर्णयाविरुद्ध टिळकांनी उच्च न्यायालयात अपील केले. ते मान्य करून न्यायाधीशांनी सरकारचा निर्णय रद्द ठरवला.-----------------