शहरं
Join us  
Trending Stories
1
आणीबाणीविरोधात केंद्रीय मंत्रिमंडळात प्रस्ताव, PM मोदींसह उपस्थित मंत्र्यांनी दिले अनुमोदन
2
'पंख तुमचे, पण आकाश सर्वांचे...', काँग्रेस अध्यक्ष खरगेंच्या टीकेला शशी थरुर यांचे प्रत्युत्तर!
3
पुणेकरांसाठी मोठी बातमी! मेट्रो लाईन २ च्या विस्ताराला मंजुरी, केंद्राचा ३६२६ कोटींचा निधी
4
Viral Video : आजीबाईंनी असा ट्रॅक्टर चालवला की सगळे बघतच राहिले! नेटकरीही म्हणतायत वाह वाह...
5
इंदिरा गांधींचा निर्णय संविधानिक, ११ वर्षांपासून सुरू असलेल्या अघोषित आणीबाणीचे काय?: सपकाळ
6
इराणचा अणुबॉम्बबाबत मोठा निर्णय; अणुनिरीक्षण संस्थेशी संबंध तोडणार!
7
ना रोहित-विराटसारखी धमक; ना सिनियर्ससमोर बोलण्याचं धाडस! गिलच्या कॅप्टन्सीवर दिग्गजाचे मोठं वक्तव्य
8
Sara Tendulkar सोबत 'भटकंती', टीम इंडियाच्या क्रिकेटरसोबत 'डेटिंग'च्या चर्चा, कोण आहे Grace Hayden?
9
आता वर्षातून दोनदा होणार दहावीच्या बोर्डाची परीक्षा; CBSE बोर्डाचा मोठा निर्णय
10
उल्हासनगर महापालिका आयुक्त व आमदारात चर्चा, शहर समस्यांचा वाचला पाडा
11
“शक्तिपीठ महामार्गाला विरोध असणाऱ्यांनी सरकारमधून बाहेर पडून दाखवावे”; काँग्रेसचे आव्हान
12
Raja Raghuvanshi Murder: राजा रघुवंशी हत्या प्रकरणात पोलिसांना मोठे यश; नाल्यात सापडला सोनमचा लॅपटॉप आणि पिस्तूल
13
तुमचा म्युच्युअल फंड तोट्यात आहे का? एका वर्षात १४ योजनांनी दिले निगेटिव्ह रिटर्न; अशा वेळी काय करावं?
14
पती ५०००० रुपयांचे कर्ज फेडू शकला नाही,पत्नीला विकलं; पण पुढे जे झालं ते ऐकून पोलीसही हैराण 
15
हिमाचलच्या कुल्लूमध्ये ढगफुटीसारखा पाऊस; मोठं नुकसान,पुरात घरे वाहून गेली, व्हिडीओ व्हायरल
16
“निवडणूक आयोगाने शहानिशा केली नाही, मतचोरीची उच्चस्तरीय चौकशी करा”; काँग्रेसची मागणी
17
Dharashiv: 'शक्तीपीठ'च्या जमीन मोजणीस विरोध; पोलिसांसोबत झटापटीत ६ शेतकरी जखमी
18
ICC Latest Test Rankings : रिषभ पंतला मिळालं मोठं बक्षीस! बुमराह-रुटचा दबदबा कायम
19
भारतासोबत PoK-दहशतवादावर चर्चा करण्यास तयार..; पाकिस्तानची 'या' देशाला मदतीची विनंती
20
गुरुवारी टेंबेस्वामी पुण्यतिथी: ‘दिगंबरा दिगंबरा..’ हा कालातीत मंत्र देणारे थोर दत्तोपासक

ज्वारीची श्रीमंती वाढली; गव्हापेक्षाही जास्त भाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2021 04:16 IST

ग्रामीण भागात परंपरेनुसार ज्वारीला जास्त महत्त्व आहे. वयोवृद्ध नागरिक आजही दरारोज ज्वारीची किंवा बाजरीची भाकरी खायला प्राधान्य देतात. ज्वारी ...

ग्रामीण भागात परंपरेनुसार ज्वारीला जास्त महत्त्व आहे. वयोवृद्ध नागरिक आजही दरारोज ज्वारीची किंवा बाजरीची भाकरी खायला प्राधान्य देतात. ज्वारी पचनास सुलभ, शरीरासाठी पौष्टिक असते. रक्तदाब, हृदयाशी संबंधित आजार, पोटाचे विकार असलेल्यांना डॉक्टर ज्वारीची भाकरी खाण्याचा सल्ला देतात. ज्वारीची भाकरी खाण्याचे फायदे खूपच गुणकारी आणि आरोग्यदायी असल्याने शहरी भागातील नागरिकांनीदेखील ज्वारी खायला सुरुवात केली आहे. पूर्वी गव्हाचा अधिक भाव होता. मात्र, आता भावाबाबत ज्वारीने गव्हाला मागे टाकले आहे. मालदांडी, गावठी, पाच नंबर आणि नऊ नंबर, असे ज्वारीचे प्रकार आहेत. यात मालदांडी ज्वारीला चार हजार रुपये क्विंटल एवढा भाव आहे. ही ज्वारी बीड जिल्ह्यातून येते. गावठी ज्वारीला प्रतवारीनुसार दोन ते तीन हजार रुपये क्विंटल भाव आहे.

-----------------

आरोग्य आणि पोषण आहाराच्या दृष्टीने ज्वारीचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. कमी पावसात किंवा कमी पाण्यात मध्यम ते हलक्या जमिनीत शेतकरी चांगल्या प्रकारे ज्वारीचे उत्पन्न घेऊ शकतात. ज्वारीचा कडबा दुभत्या जनावरांसाठी चांगला आहे. ज्वारीची वाढती मागणी आणि मिळणारा चांगला भाव याचा विचार करून शेतकऱ्यांनी ज्वारीचे पिकाचे उत्पादन घेतल्यास त्यांना चांगला आर्थिक फायदा होऊ शकतो.

-प्रशांत शेंडे, तालुका कृषी अधिकारी, संगमनेर

-------------------

ज्वारीचा भाव ३०, ३५ आणि ४० रुपये किलो, असा आहे, तर गव्हाचा भाव २५ ते ३० रुपये किलो आणि बाजरीचा भाव २० ते २५ रुपये किलो आहे. गहू आणि बाजरीपेक्षाही ज्वारीचा भाव अधिक आहे. ज्वारी गावठी, मालदांडी, नऊ नंबर आणि पाच नंबर, असे प्रकार आहेत. ज्वारीचे भाव पूर्वीपेक्षा वाढले आहेत.

-भरत बाबूलाल शाह, भुसार मालाचे व्यापारी, संगमनेर

-------------------

मालदांडी ज्वारीला बीड जिल्ह्यात दगडी ज्वारी, असे म्हणतात. रब्बी हंगामात आम्ही ज्वारीचे उत्पादन घेतो. कमी पाण्यात हे पीक येते. शाश्वत आणि दुहेरी उत्पन्न यातून मिळते. जनावरांना चारा होतो आणि खाण्यासाठी ज्वारी तयार होते. आमच्या कुटुंबातील सर्व सदस्य बाराही महिने ज्वारी खातात.

-श्रीकन्या जाधव, श्रीपतरायवाडी, ता. अंबाजोगाई, जि. बीड

----------------

आमच्याकडे रब्बी हंगामातील मुख्य पीक ज्वारी हेच आहे. कमी पावसात हे पीक येत असल्याने ते घ्यायला परवडते. अनेक वर्षांपासून आम्ही हेच पीक घेतो. आमच्या कुटुंबात सर्व सदस्यांच्या आहारात मुख्य अन्न म्हणून ज्वारीचा समावेश जास्तीत जास्त असतो. ज्वारी खाण्याचे फायदे आहेत.

-अमोल संजय बाबर, रा. बेलगाव, ता. कर्जत, जि. अहमदनगर

--------------

- गावाकडे पूर्वी ज्वारीचे पीक घेतले जायचे, त्यामुळे जेवणात दररोज ज्वारीची भाकरी असायची. मात्र, आता कधी गव्हाची पोळी, ज्वारी, बाजरीची भाकरी, असा जेवणात समावेश असतो. ज्वारीच्या भाकरीची चव वेगळीच लागते.

-राधाबाई भोसले, रा. घोडेकर मळा, संगमनेर

-------------