शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
2
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
3
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
4
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
5
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
6
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
7
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
8
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
9
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
10
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
11
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
12
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
13
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
14
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
15
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
16
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
17
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
18
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
19
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
20
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
Daily Top 2Weekly Top 5

Independence Day 2018 शूरा आम्ही वंदिले : मरणाला नाही भ्याला कोंडाजी अमर जाहला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2018 07:30 IST

‘१९६५च्या भारत पाकिस्तान युद्धात पंजाब लगतच्या सरहद्दीवर झालेल्या घनघोर संघर्षात शहीद सैनिक कोंडाजी लक्ष्मण मालुंजकर यांना २ आॅक्टोबर १९६५ ला वीरगती प्राप्त झाली.’

‘ मै भारत सरकार और अपनी और से आप के दु:ख में यह संदेश भेज रहा हूँ। भारत की जनता का हृदय भी आप के साथ है। हम सबकी प्रार्थना है कि इस महान शोक में भी आप को धैर्य और शांती प्रदान हो।’ दिवंगत पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांचे हे पत्र येण्यापूर्वी ७ आॅक्टोबर १९६५ ला रुंभोडीत ‘४७’ शब्दांची तार आली. त्यात संदेश होता.. ‘१९६५च्या भारत पाकिस्तान युद्धात पंजाब लगतच्या सरहद्दीवर झालेल्या घनघोर संघर्षात शहीद सैनिक कोंडाजी लक्ष्मण मालुंजकर यांना २ आॅक्टोबर १९६५ ला वीरगती प्राप्त झाली.’ गावातील अवघ्या २७ वर्षांचा जवान शहीद झाला.. रुंभोडीकरांचं काळीज दुभंगून टाकणारी ही तार.. रुंभोडी-इंदोरीकरांसह मालुंजकर कुटुंबाला दु:खद असली तरी देशासाठी त्यांचे बलिदान कामी आले.अकोले तालुक्यातील मालुंजे गावचे वीरपुत्र शहीद कोंडाजी मालुंजकर यांचा जन्म २० नोव्हेंबर १९३८ रोजी झाला. वडील लक्ष्मण व आई सरुबाई यांचे ते एकुलते एक पुत्र. देऊबाई या त्यांच्या बहीण. देऊबाई नऊ वर्षांच्या व ते सात वर्षांचे असताना त्यांचे मातृपितृ छत्र हरपले. पुढे चुलत्यांनी आणि नंतर देऊबाई यांनी त्यांचा सांभाळ केला. त्यांची बहीण देऊबाई यांचे पुंजाजी नवले यांच्याशी झाले. १९५६च्या दरम्यान देऊबाई यांनी इंदोरी गावातीलच लोहटे कुटुंबातील लहानबाई यांच्याशी कोंडाजी यांचे लग्न लावून दिले. लग्नासाठी कोंडाजी यांनी रोजगारासाठी एकट्याने गाव सोडलं. मुंबापुरी गाठली. मुंबईत पितळी भांड्यांना ‘कलही’ लावण्याचं हंगामी काम ते करत. उंची साडेसहा फूट, रुबाबदार शरीरयष्टी यामुळे ते पोलिसात भरती झाले. पण ही बाब त्यांच्या घरातील लोकांना आवडली नाही. त्यांना तत्काळ नोकरी सोडावी लागली. त्यांनी पुन्हा मुंबई गाठली. पण त्या कामात त्यांचे मन रमेना आणि लग्न झाल्यानंतर चार-पाच वर्षांनी वयाच्या २३ व्या वर्षी २० नोव्हेंबर १९६१ ला ते भारतीय सैन्यदलात भरती झाले.भरती झाल्यानंतर तीन-चार महिने ते घरीच आले नाहीत. घरातील विरोध झुगारून त्यांनी सैन्यदलात दाखल होणं त्यांचे चुलते, काकू यांना आवडलं नाही. त्यामुळे बायकोसह त्यांनी सासूरवाडी गाठली आणि सासूरवाडीचे आधार बनले. सैन्यदलात ते मराठा बटालियन बेळगावमध्ये शिपाई म्हणून सेवा बजावू लागले. १९६५ च्या युद्धात पंजाबच्या सीमावर्ती भागात शत्रूशी लढताना रात्री सव्वाअकरा वाजण्याच्या सुमारास शत्रूची गोळी लागून २ आॅक्टोबर १९६५ रोजी ते शहीद झाले. रुंभोडीतील मेजर दौलत दिनकर देशमुख त्यावेळी सैन्यदलात प्रमुख पदावर होते. त्यांनी ओळख पटल्यानंतर सरकारच्या मदतीने रुंभोडीला तारेने संदेश पाठवला. ही तार पाच दिवसांनी रुंभोडीत दाखल झाली. तो दिवस होता शुक्रवार. त्या वर्षीच्या दसऱ्यानंतरचा दुसरा दिवस. रुंभोडी-इंदोरी दोन्ही जुळी गावं दु:ख सागरात बुडाली. शहीद कोंडाजींवर मृत्यूनंतरचे सर्व सोपस्कार सरकारने पूर्ण केले. मालुंजकर कुटुंबाजवळ केवळ एक तारेचा कागद हीच शेवटची आठवण उरली. ‘१९६५ ला रंगपंचमीचा सण झाल्यानंतर ते सीमेवर गेले़ परत आलेच नाहीत. नवरात्री उत्सवात त्यांना वीरगती प्राप्त झाल्याची बातमी हाती आली. त्यांना वीरगती मिळाली, तेव्हा मुलगा दीपक अवघा दीड वर्षाचा होता, असे लहानबाई सांगत होत्या. त्यावेळी त्यांना आपले अश्रू लपवता आले नाही. लहानबार्इंनी माहेरी राहून एकुलता एक मुलगा दीपक बरोबर आई-वडिलांचाही सांभाळ केला. त्यांना त्यावेळी २७ रुपये पेन्शन मिळत असे. ‘चाकर असावं, पण बेकार नसावं’ हे पतीचं वाक्य लहानबार्इंच्या स्मरणात होतं. पती निधनानंतर पाच वर्षांनी त्यांनी विडी तयार करण्याची कला शेजारी असलेल्या महिलांकडून अवगत करून घेतली आणि विडी कामगार म्हणून काम करीत मुलाला मोठं केलं. शहीद कोंडाजी यांचा मुलगा दीपक यांना दोन मुलं. त्यांचीही लग्न झाली आहेत. दीपक आजोबा आणि वीरपत्नी लहानबाई पणजी झाल्या आहेत.

शिपाई कोंडाजी मालुंजकरजन्मतारीख २० नोव्हेंब १९३८सैन्यभरती २० नोव्हेंबर १९६१वीरगती २ आॅक्टोबर १९६५ (भारत -पाक युद्ध)सैन्यसेवा ३ वर्षे १० महिने १२ दिवसवीरपत्नी लहानबाई कोंडाजी मालुंजकर.शब्दांकन : हेमंत आवारी

टॅग्स :Independence Dayस्वातंत्र्य दिनRepublic Day 2018प्रजासत्ताक दिन २०१८Lokmatलोकमत