श्रीगोंदा : श्रीगोंदा विधानसभा मतदार संघात भाजप कायमच अपयशी राहिला आहे़ म्हणून आगामी विधानसभा निवडणुकीत श्रीगोंदा मतदार संघ बदलून शिवसेनेला मिळावा, अशी मागणी पक्षश्रेष्ठी कडे केली आहे, अशी माहिती शिवसेनेचे नगर दक्षिणचे जिल्हा प्रमुख प्रा़ शशिकांत गाडे यांनी दिली़ माझा महाराष्ट्र भगवा महाराष्ट्र या अभियानातून शिवसेनेचे सभासद नोदणी अभियान सुरु आहे़ अभियानाची माहिती देण्यासाठी गाडे यांनी श्रीगोंदा येथे पत्रकारांशी वार्तालाप केला़ गाडे म्हणाले, शिवसेनच्या सभासद नोंदणीला चांगला प्रतिसाद मिळत आहे़ शिवसेना दर दोन वर्षांनी सभासद नोंदणी करीत आहे़ या वर्षीही सभासद नोंदणी अभियान सुरु आहे़ श्रीगोंदा तालुक्याला २५ ते ३० हजार सभासद नोंदणी करण्याचे उद्दिष्ट दिले आहे़ सध्या तालुक्यात आठ हजार नावांची नोंदणी झाली असून प्रत्येक गावात जावून नोंदणी करण्याचे काम सुरु आहे़ नोंदणी झाल्यावर प्रत्येक गावात जावून शाखा उघडण्यात येणार असल्याचे गाडे यांनी सांगितले़गाडे म्हणाले, श्रीगोंदा विधानसभा मतदार संघ सध्या भाजपच्या कोट्यात आहे़ पण गेल्या अनेक वर्षांपासून भाजपला अपयश येत आहे़ त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत हा मतदार संघ शिवसेनेला द्यावा, अशी मागणी पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे़ जर हा मतदारसंघ शिवसेनेला मिळाला नाही तर भाजप उमेदवाराचे काम करणार असल्याचे गाडे म्हणाले़ यावेळी शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख राजेंद्र दळवी, जेष्ठ नेते भाऊसाहेब गोरे, नंदकुमार ताडे, मच्छिंद्र सुद्रीक, संतोष शिंदे आदी उपस्थित होते़ तालुका प्रतिनिधी)आंदोलनांचा देखावासध्या कुकडीच्या पाणी प्रश्नावरून तालुक्यात आंदोलन करण्याची स्पर्धा नेत्यांमध्ये सुरु आहे़ निवडणुका आल्या की नेत्यांना शेतकऱ्यांचे प्रश्न आठवतात व आंदोलने करतात़ फक्त देखावा करण्यासाठी आंदोलने केली जात असल्याची टीका गाडे यांनी केली़
श्रीगोंद्यावर केला शिवसेनेने दावा
By admin | Updated: July 22, 2014 00:08 IST