कर्जत : केंद्र सरकारने पेट्रोल-डिझेलची केेलेली भाववाढ, केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी शेतकऱ्यांबाबत केलेले वक्तव्य यांचा निषेध नोंदविण्यासाठी शिवसेनेच्या वतीने कर्जत तहसीलवर शनिवारी मूक मोर्चा काढण्यात आला.
तहसीलदार सुरेश वाकचौरे, पोलीस निरीक्षक सुनील गायकवाड यांना निवेदन दिले. केंद्र सरकारने पेट्रोल व डिझेलची भाववाढ केली आहे. ही भाववाढ मागे घ्यावी. तसेच केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी शेतकऱ्यांच्या आंदोलनाबाबत केलेल्या वक्तव्याचा निषेध नोंदविण्यात आला.
यावेळी शिवसेना नेते बळीराम यादव, तालुका प्रमुख दीपक शहाणे, शहर प्रमुख अशोक डोंगरे, यशवंत थोरात, शिवाजी नवले, अनिल यादव, शाहीद झारेकरी, सुशांत कुलथे, पांडुरंग जठार, दीपक मांडगे, खाजूभाई बागवान, आनंद आल्हाट, सागर भिसे आदींसह शिवसैनिक उपस्थित होते.
(फोटो १२ कर्जत शिवसेना)
कर्जत येथे शिवसेनेच्या वतीने तहसीलदार सुरेश वाकचौरे यांना निवेदन देण्यात आले.