शहरं
Join us  
Trending Stories
1
"चीनपेक्षाही धोकादायक म्हणजे RSS…"; ओवेसींनी साधला निशाणा, PM मोदींना विचारला एक प्रश्न
2
ठाकरे बंधूंच्या पॅनेलला टक्कर देण्यासाठी देवेंद्र फडणवीसांनी २ शिलेदारांवर सोपवली जबाबदारी
3
भारताच्या स्वातंत्र्याने खलिस्तान्यांना होतोय त्रास; ऑस्ट्रेलियाच्या रस्त्यांवर गोंधळ घातला
4
पाकिस्तानमध्ये हाहाकार! ढगफुटी, पूर आणि भूस्खलनात ४१ लोकांचा मृत्यू, असंख्य बेपत्ता; पाचशे पर्यटक अडकले
5
प्रियकराची ओढ, पत्नीचं संसाराकडे दुर्लक्ष; त्यानंतर पतीने जे केले..., सासरचे जावयावरच उलटले
6
सुदर्शन चक्र, दहा वर्षात तयार होणार भारताचं स्वदेशी सुरक्षा कवच, सर्व शस्त्रास्त्रे ठरणार निष्प्रभ, अशी आहे योजना
7
“जालना, मुंबई, दिल्लीत कुठेही आंदोलन कर, पण...”; जरांगेंच्या निर्धारावर भुजबळ स्पष्टच बोलले
8
'दहा मृतदेह आम्ही स्वतःच बाहेर काढले, अजूनही लोक मातीखालीच...'; चशोटीत आक्रोश, मन्न सुन्न करणारे अनुभव
9
"त्यांनी माझे गाल ओढले, दंडाला चिमटे काढले...", हळदीकुंकूच्या कार्यक्रमाला गेलेल्या प्रिया बेर्डेंना चाहत्यांकडून आलेला धक्कादायक अनुभव
10
क्रिकेटरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी दिसणार सलमान खानच्या 'बिग बॉस १९'मध्ये?, जाणून घ्या याबद्दल
11
"भारत-पाक संघर्ष अणुयुद्धात बदलला असता, मी होतो म्हणून..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा 'तो' दावा कायम
12
शशी थरूर 'क्लीन बोल्ड'! एका तरूणाच्या इंग्रजी ट्विटने काढली 'विकेट', रिप्लाय देत म्हणाले...
13
जन्माष्टमी २०२५: ‘या’ राशींवर श्रीकृष्ण कृपा, पैसे कमी पडत नाहीत; सुबत्ता-वैभव-भरभराट लाभते!
14
राजा रघुवंशीच्या घरी अचानक पोहोचला पोलिसांच्या वेशातील व्यक्ती; कुटुंबाला आला संशय, तपास करताच धक्कादायक सत्य उघड
15
७ वर्षांनी डोनाल्ड ट्रम्प आणि पुतिन भेट होणार; ३२ हजार सैन्य तैनात, ३०० किमी परिसरात 'नो फ्लाय झोन'
16
"कोणतीही अघोरी शक्ती आली तरी मराठी माणसांची..."; 'या' महापालिकांमध्ये मनसे-शिवसेना एकत्र लढणार?
17
PM मोदींनी सर्व रेकॉर्ड मोडले, लाल किल्ल्यावर १०३ मिनिटे भाषण केले; पाहा, १० मोठे मुद्दे
18
"युवराज्ञींना येणं भाग पडलं...", प्राजक्ता-शंभुराजच्या साखरपुड्याला आली भोसले राजघराण्यातील महत्त्वाची व्यक्ती, अभिनेत्रीची खास पोस्ट
19
सूरज चव्हाणला पक्षात बढती, अजित पवार म्हणतात, "मला माहिती नाही..."; सुनील तटकरेंचा वेगळाच दावा
20
“स्वातंत्र्य चळवळ अन् RSSचा संबंध काय? PM मोदी पुन्हा लाल किल्ल्यावरून खोटे बोलले”: सपकाळ

भिंगारमध्ये महाविकास आघाडीचा प्रयोग फसला शिवसेना-भाजप एकत्र : छावणी परिषदेच्या उपाध्यक्षपदी सेनेचे फुलारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2020 16:42 IST

भिंगार : राज्यात सर्वत्र महाविकास आघाडीचा फॉर्म्युला असताना अहमदनगर छावणी परिषदेमध्ये मात्र शिवसेना-भाजप एकत्र येत शिवसेनेचे प्रकाश फुलारी यांची छावणी परिषदेच्या उपाध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली. मागच्या वेळी राष्ट्रवादीसोबत असलेल्या भाजप पुरस्कृत सदस्या शुभांगी साठे यांनी सेनेला पाठिंबा दिला. हा एक राष्ट्रवादी काँग्रेसला जोराचा धक्काच मानला जात आहे. 

अनिकेत यादवभिंगार : राज्यात सर्वत्र महाविकास आघाडीचा फॉर्म्युला असताना अहमदनगर छावणी परिषदेमध्ये मात्र शिवसेना-भाजप एकत्र येत शिवसेनेचे प्रकाश फुलारी यांची छावणी परिषदेच्या उपाध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली. मागच्या वेळी राष्ट्रवादीसोबत असलेल्या भाजप पुरस्कृत सदस्या शुभांगी साठे यांनी सेनेला पाठिंबा दिला. हा एक राष्ट्रवादी काँग्रेसला जोराचा धक्काच मानला जात आहे. डिसेंबर २०१५ मध्ये अनपेक्षितरित्या छावणी परिषदेवर सत्ता काबीज करणाºया राष्ट्रवादीला सत्तेवरुन पायउतार व्हावे लागले आहे. छावणी परिषद सदस्यांची मुदत संपल्याने, केंद्रीय संरक्षण मंत्रालयाने विद्यमान सदस्यांना सहा महिन्यांची मुदतवाढ दिली होती. मुदतवाढ देतांना पुन्हा उपाध्यक्षपदासाठी निवडणूक घेण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. त्यानुसार उपाध्यक्षपदासाठी घेतलेल्या निवडणुकीत सेनेचे प्रकाश फुलारी यांचा एकमेव अर्ज आला. त्यामुळे छावणी परिषदेचे पदसिद्ध अध्यक्ष ब्रिगेडियर विजयसिंग राणा यांनी फुलारी यांना विजयी घोषित केले. भाजपच्या शुभांगी साठे यांनी सेनेला पाठिंबा दर्शवल्याने राष्ट्रवादीने अर्ज दाखल केला नाही. २०१५ साली झालेल्या निवडणुकीत सेना व राष्ट्रवादीला प्रत्येकी तीन जागा तर एक जागा भाजप पुरस्कृत उमेद्वाराने पटकावली होती. त्यावेळी भाजप पुरस्कृत शुभांगी साठे यांनी राष्ट्रवादीला पाठिंबा दिल्याने मुसाद्दीक सय्यद उपाध्यक्षपदी विराजमान झाले होते. मात्र त्यांची काम करण्याची पद्धत राष्ट्रवादीसह अन्य सदस्यांना खटकत असल्याने गेल्या चार वर्षांपासून आमदार संग्राम जगताप यांच्याकडे सय्यद यांना बदलण्याची मागणी राष्ट्रवादीच्या सदस्यांनी लावून धरली होती. या पार्श्वभूमीवर सहा महिन्यानंतर  होणाºया निवडणुकीच्या तोंडावर झालेला बदल हा राष्ट्रवादी पक्षासाठी धक्का मानला जात आहे. काँग्रेस व सेनेचे प्राबल्य असलेल्या भिंगार शहरात राष्ट्रवादीने आश्चर्यकारक मुसंडी मारत छावणी परिषद ताब्यात घेतली होती. ऐन निवडणुकीच्या तोंडावर झालेली उलथापालथ राष्ट्रवादीला परीक्षण करायला लावणारी आहे. राष्ट्रवादीने त्यावेळी बदल करण्यात अनुकूलता दाखवली नसल्याने नाराज सदस्यांनी बुधवारी झालेल्या उपाध्यक्ष पदाच्या निवडणुकीत सक्रिय न होता शांत बसणेच पसंत केले. उपाध्यक्षपदाची निवडणूक ब्रिगेडियर विजयसिंग राणा, छावणी परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विद्याधर पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. यावेळी छावणी परिषद सदस्य मिना मेहतानी, शुभांगी साठे,कलीम शेख, रवींद्र लालबोन्द्रे, मुसद्दीक सय्यद, संजय छजलानी उपस्थित होते. माजी आमदार अनिल राठोड, भाजपचे अभय आगरकर यांनी फुलारी यांचा सत्कार केला.