शिर्डी : रमजान ईद येथे मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली़ कृषिमंत्री राधाकृष्ण विखे यांनी ईदगाह मैदानावर जाऊन मुस्लीम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दिल्या़ राज्यात सर्वत्र मोठ्या प्रमाणावर पाऊस होवुन दुष्काळ हटू दे, अशी प्रार्थनाही विखे यांनी यावेळी केली़रमजान ईदनिमित्त शिर्डीतील ईदगाह मैदानावर मुस्लीम बांधवांनी सामूहिक नमाज अदा केली़ नमाज नंतर मुस्लीम बांधवाना शुभेच्छा देण्यासाठी कृषिमंत्री राधाकृष्ण विखे, शिर्डीचे माजी नगराध्यक्ष कैलास कोते, उपनगराध्यक्ष निलेश कोते, शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख अभय शेळके, राजेंद्र कोते, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष बाबासाहेब डांगे, युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष ताराचंद कोते, रमेश गोंदकर, ज्ञानेश्वर गोंदकर, डॉ़ नचिकेत वर्पे, रविंद्र गोंदकर आदी उपस्थित होते़ यावेळी बोलतांना विखे यांनी येथे अनेक वर्षापासुन बंधुभावाचे वातावरण असल्याबद्दल समाधान व्यक्त केले,राज्यात सर्वत्र पाऊस पडावा व राज्यावरील दुष्काळाचे संकट दूर व्हावे अशी प्रार्थनाही त्यांनी यावेळी केली़ (तालुका प्रतिनिधी)राहुरी : तालुक्यात रमजान ईद उत्साहात साजरी झाली़ राहुरी येथील इदगाह मैदानात मुस्लीम बांधवांनी नमाज पठण करून एकमेकांना शुभेच्छा दिल्या. ४माजी खासदार प्रसाद तनपुरे व आमदार शिवाजीराव कर्डिले यांनी उपस्थित मुस्लीम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दिल्या़ सभापती अरूण तनपुरे, उपनगराध्यक्ष इस्माईल सय्यद, पोलीस निरीक्षक संजय पाटील, कंकर शेख, शब्बीर देशमुख, नानासाहेब गागरे, किशोर गुंदेचा, प्रकाश पारख, रावसाहेब तनपुरे, बाळासाहेब उंडे, अरूण ठोकळे, अनिल कासार आदी उपस्थित होते़
शिर्डी, राहुरीत ईद उत्साहात
By admin | Updated: July 30, 2014 00:46 IST