श्रीरामपूर : तालुक्यातील बेलापूर येथे संस्कृती मंगल कार्यालय येथे ५० बेड्सचे कोविड सेंटर सुरु करण्यात आले.
जनता आघाडी, कर्मवीर मुरलीधर खटोड जनलक्ष्मी पतसंस्था, शनैश्वर यात्रा समिती व खासदार सदाशिव लोखंडे यांच्या मार्गदर्शनाखाली साई खेमानंद फाउंडेशनच्या सहकार्याने हे केंद्र सुरू करण्यात आले.
याप्रसंगी खासदार सदाशिव लोखंडे, भाजपचे प्रकाश चित्ते, पं.स.सदस्य अरुण नाईक, अशोक थोरे, ज्ञानेश्वर मुरकुटे, बाजार समितीचे संचालक सुधीर नवले, उपसरपंच अभिषेक खंडागळे, भरत साळुंके, रवींद्र खटोड, पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष वासुदेव काळे, विलास मेहेत्रे, प्रशांत लढ्ढा आदी उपस्थित होते.
घरी विलगीकरणाची सुविधा नसलेल्या रुग्णांची येथे व्यवस्था करण्यात आली आहे. डॉ.रामेश्वर राशिनकर, डॉ.शैलेश पवार हे रुग्णांची व्यवस्था पाहणार आहेत. विलगीकरण काळात रुग्णांना नि:शुल्क भोजन व औषधे दिली जाणार आहेत.
--------------------