तिसगाव : पाथर्डी तालुक्यातील तिसगाव- मिरी मार्गावरील के. बी. फार्मनजीक गावठी कट्टा विकताना चौघा जणांना पकडण्यात आले. हा कट्टा जप्त करण्यात आला आहे. विक्री करणारे दोघे मिरी तर दोघेजण कडगाव (ता.पाथर्डी) येथील रहिवासी आहेत.दिनेश जगन्नाथ वेताळ (वय १९) व विनोद गंगाधर गवळी (वय २५) दोघे रा.मिरी, ता.पाथर्डी तर ममताजी त्रिंबक पालवे (वय ५२) व गणेश प्रल्हाद पालवे (वय २८, रा. कडगाव) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे असून, यातील मुख्य सूत्रधार फरार आहे. गुप्त माहिती आधारे कारवाईसदर गावठी कट्टा विक्रीबाबतची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलीस निरीक्षक सुभाष अनमुलवार, पो.कॉ. संजय आव्हाड, ज्ञानेश्वर खरमाटे, सुहास गायकवाड, संभाजी शेंडे यांनी मिरी शिवारात सापळा लावला. पोलिसांनी बनावट ग्राहकाद्वारे मिरी येथील एका तरुणाकडे दूरध्वनीवरून संपर्क करुन गावठी कट्टा पाहिजे, अशी बतावणी केली. मिरी शिवारातील के.बी. फार्मनजीक भेटण्याचेही ठरले. पैसे आणल्याची खात्री झाल्यानंतर दोघे जण तेथे आले. येथे उभयतांमध्ये चाळीस हजारात व्यवहार ठरला.दरम्यान, दबा धरून बसलेल्या पोलिसांनी झडप घातली. पोलिसांनी घेरल्याचे लक्षात येताच आरोपींनी पळ काढला, मात्र पाठलाग करून आरोपींना पकडण्यात पोलिसांना यश आले. (वार्ताहर)
गावठी कट्ट्याची विक्री ; चौघा जणांना अटक
By admin | Updated: June 26, 2014 00:45 IST