कर्जत : रुईगव्हाण (ता. कर्जत) येथील निराधार झालेल्या पंधरा कुटुंबांना कर्जत तालुका कृषी विभागाच्या वतीने खरीप हंगामात पेरणी करण्यासाठी उडीद बियाणेवाटप करण्यात आले. राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानासाठी रुईगव्हाण या गावची निवड करण्यात आली. कोरोनाच्या पहिल्या व दुसऱ्या लाटेत कर्जत तालुक्यातील रुईगव्हाण येथील पंधरा कुटुंबे निराधार झाली होती. कृषी विभागाचे उपविभागीय कृषी अधिकारी प्रवीण गवांदे व तालुका कृषी अधिकारी दीपक सुपेकर यांच्या संकल्पनेतून व राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानामधून पंधरा कुटुंबांना १५० किलो उडीद बियाणे मोफत वाटप करण्यात आले. तीस एकर क्षेत्रावर याची पेरणी करण्यात आली. यावेळी मंडल कृषी अधिकारी हिंदुराव मोरे, कृषी पर्यवेक्षक विकास सुपेकर, कृषी सहायक विकास तोरडमल, सरपंच रोहिणी पवार, उपसरपंच दत्तात्रेय जामदार, अशोक पवार, नृसिंह पवार, सुनील पवार, राजेंद्र पवार, गणेश जामदार, प्रकाश जामदार, बारकू काळे आदी उपस्थित होते.
रुईगव्हाण येथे शेतकऱ्यांना बियाणेवाटप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2021 04:15 IST