शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
2
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
3
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
4
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
5
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
6
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
7
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
8
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
9
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
10
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
11
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
12
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
13
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
14
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
15
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
16
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
17
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
18
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
19
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
20
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

जळगावच्या रिनी शर्मा ठरल्या किताबाच्या मानकरी

By admin | Updated: September 2, 2014 23:33 IST

लोकमत सखी मंच व सोनी पैठणी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित राज्यस्तरीय ‘सखी सम्राज्ञी’ या व्यक्तिमत्त्व स्पर्धेचा दिमाखदार महाअंतिम सोहळा मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला.

नाशिक: दिसण्यापेक्षा असण्यावर भर देणारी, सामान्य ज्ञानापासून तर कलाविष्काराच्या कसोटीतून पात्र ठरविणारी, आत्मविश्वासातून सम्राज्ञीपर्यंतचा प्रवास लीलया घडविणारी सखी सम्राज्ञी २०१४ ची महाअंतिम फेरी म्हणजे कलागुणांची चौफेर उधळण करणारा नेत्रदीपक सोहळा होता. लोकमत सखी मंच व सोनी पैठणी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित राज्यस्तरीय ‘सखी सम्राज्ञी’ या व्यक्तिमत्त्व स्पर्धेचा दिमाखदार महाअंतिम सोहळा मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला. जळगावच्या रिनी शर्मा या ‘सखी सम्राज्ञी २०१४’ किताबाच्या मानकरी ठरल्या. लोकमत सखी मंचच्या गोवासहित महाराष्ट्रात १३ विभागात प्राथमिक फेरी, अंतिम फेरी आणि राज्यस्तरीय अंतिम फेरी अशाप्रकारे ही स्पर्धा घेण्यात आली. प्रत्येक ठिकाणी जिंकलेल्या १३ सखीसम्राज्ञींची दिनांक २५ व २६ आॅगस्ट रोजी नाशिक येथे महाअंतिम फेरी घेण्यात आली. केवळ बाह्य सौंदर्यावर भर न देता बौद्धिक क्षमतेची उंची लक्षात घेऊन सहा फेऱ्यांमध्ये ही स्पर्धा घेण्यात आली. या २५ तारखेला सामान्य ज्ञान फेरी आणि वक्तृत्व स्पर्धा (समयस्फूर्त फेरी) घेण्यात आली. दिलेल्या विषयावर वेळेवर बोलायचे होते. अगदी आधुनिक युगापासून तर पौराणिक विषयांचा समावेश या स्पर्धेत होता आणि दि. २६ तारखेला रंगमंचावरचा चार फेऱ्यांचा दिमाखदार सोहळा नाशिककरांसाठी आनंदाची पर्वणी ठरला. या स्पर्धेचा महाअंतिम सोहळा नाशिकच्या कालिदास कलामंदिर येथे पार पडला. या कार्यक्रमास अभिनेत्री सुधा चंद्रन, अभिनेते रवींद्र मंकणी, गायक अभिजित कोसंबी यांची विशेष उपस्थिती होती. प्रमुख पाहुणे म्हणून गोविंद दंडे अ‍ॅण्ड सन्सचे संचालक धनंजय दंडे, सौ. मीना दंडे, सोनी पैठणीचे संचालक संजय सोनी, सौ. सोनी, श्रीवास्तव सोनी, हॉटेल रॉयल हेरिटेजच्या सौ. मुग्धा शाह, समुपदेशक सुषमा करंदीकर उपस्थित होते. या कार्यक्रमाला गोविंद दंडे अ‍ॅण्ड सन्स यांचे सहप्रायोजकत्व लाभले. प्रारंभी कलानंद कथ्थक नृत्य संस्थेच्या कलावंतांनी नृत्य सादर केले. यावेळी मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. प्रास्ताविक लोकमतचे सहायक उपाध्यक्ष बी. बी. चांडक यांनी केले. सखी सम्राज्ञी स्पर्धेसाठी अहमदनगर, अकोला, औरंगाबाद, गोवा, जळगाव, कोल्हापूर, लातूर, मुंबई, नागपूर, नांदेड, नाशिक, पुणे आणि सोलापूर येथील स्पर्धक सहभागी झाले होते. स्पर्धेतील पहिल्या प्रांतिक वेशभूषा फेरीत स्पर्धकांनी विविध प्रांतांची वेशभूषा करून रंगमंचावर येत आपला परिचय करून दिला. दुसऱ्या ‘कलाविष्कार’ या फेरीत स्पर्धकांनी कलागुण सादर केले. त्यामध्ये अनेकांनी नृत्य, तर काहींनी अभिनय सादरीकरण केले. अ‍ॅड मॅड शो फेरीत सहभागी स्पर्धक सखींनी विविध प्रकारच्या उत्पादनांचे विडंबनात्मक सादरीकरण करून धमाल उडवून दिली. परीक्षक फेरीत स्पर्धकांनी समर्पक उत्तरे दिलीत. स्पर्धेच्या पहिल्या फेरीनंतर सॅव्ही फॅशन इन्स्टिट्यूटच्या विद्यार्थ्यांनी ‘साडी शो’ प्रस्तुत केला. सॅव्हीच्या संचालक श्रुती भुतडा यांनी या कार्यक्रमाचे संयोजन केले. या शोसाठी सोनी पैठणीच्या वतीने साड्या, तर दंडे यांच्या वतीने दागिने पुरविण्यात आले. यावेळी गायक अभिजित कोसंबी यांनी आपल्या सुरेल आवाजात विविध गीते सादर करून उपस्थित रसिकश्रोत्यांना मंत्रमुग्ध केले. यावेळी त्यांच्या ‘एक छत्री मला दिसते’ या अल्बमचे प्रकाशन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. या महाअंतिम सोहळ्यात अभिनेते सचिन खेडेकर उपस्थित झाले. राज्यभरातील सखी मंच संयोजिका कार्यक्रमास उपस्थित होत्या. नागपूरच्या नेहा जोशी यांनी या रंगतदार सोहळ्याचे खुमासदार सूत्रसंचालन केले. (प्रतिनिधी)स्पर्धेचा निकाल या महाअंतिम फेरीत जळगावच्या रिनी शर्मा या ‘सखी सम्राज्ञी’ ठरल्या, तर मुंबईच्या पल्लवी म्हैसकर यांनी द्वितीय, नाशिकच्या श्रद्धा राजधर यांनी तृतीय क्रमांक मिळविला. उत्कृष्ट वेशभूषा- शिवानी सावदेकर (नागपूर), उत्कृष्ट कलाविष्कार- शीतल माने (कोल्हापूर), उत्कृष्ट अ‍ॅड मॅड शो- भारती केळकर (गोवा).