उमेश कुलकर्णी, पाथर्डीलोकसभा निवडणुकीतील विक्रमी यशामुळे आगामी विधानसभा निवडणुकीसाठी भाजपाकडून उमेदवारी मिळविण्यासाठी इच्छुकांची संख्या मोठी आहे. राष्ट्रवादीचे विद्यमान आमदार चंद्रशेखर घुले यांना मात्र अंतर्गत गटबाजीला मोठ्या प्रमाणावर तोंड द्यावे लागेल, अशी चिन्हे आहेत. शेवगाव-पाथर्डी विधानसभा मतदारसंघात शेवगाव तालुका पूर्ण तर पाथर्डी तालुक्यातील पाथर्डी व टाकळीमानूर मंडल हा भाग येतो. लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीचे उमेदवार राजीव राजळे यांना या मतदारसंघातून सुमारे बारा हजार मतांची आघाडी आहे. शेवगाव-पाथर्डी मतदारसंघ राजळे यांचे ‘होम ग्राउंड’ असले तरी आ. घुले व ऐन निवडणुकीत भाजपाला सोडचिठ्ठी देऊन राष्ट्रवादीत दाखल झालेले केदारेश्वर साखर कारखान्याचे अध्यक्ष प्रताप ढाकणे यांनी राजळेंसाठी प्रयत्न केले. यापूर्वी आ.घुले, राजळे, ढाकणे हे परस्परांविरोधात होते आणि आता ते राष्ट्रवादीत आहेत.तसेच दोन्ही तालुक्यातील सर्व सत्तास्थाने राष्ट्रवादीच्या ताब्यात असल्याने राष्ट्रवादीचे या मतदारसंघात प्राबल्य असल्याचे वरकरणी दिसत असले तरी अंतर्गत गटबाजी मोठ्या प्रमाणावर असल्याने याचा फटका आ.घुले यांना बसू शकतो असे सध्याचे चित्र आहे. राजीव राजळे यांचे समर्थक कोणती भूमिका घेतात, हेही महत्वाचे आहे.या मतदारसंघावर भाजपाचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांचे मोठे प्राबल्य होते. त्यांना मानणारा मोठा वर्ग या मतदारसंघात आहे. मात्र त्यांच्या अपघाती मृत्युनंतर या मतदारसंघातील भाजप पोरका झाला आहे. लोकसभा निवडणूक निकालानंतर अनेकांनी उमेदवारीसाठी फिल्डींग लावण्यास सुरवात केली आहे. भाजपाकडून ज्येष्ठ नेते अशोक गर्जे, माजी आमदार दगडू बडे, जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याणच्या सभापती हर्षदा काकडे, शिवसेनेचे मोहन पालवे आदी इच्छुक असून त्यादृष्टीने त्यांनी फिल्डींग लावली आहे. जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागाचे माजी सभापती अर्जुन शिरसाट, आमदार चंद्रशेखर घुले यांचे एकेकाळचे कट्टर समर्थक म्हणून ओळखले जाणारे दिलीप लांडे, पाथर्डीचे नगराध्यक्ष अभय आव्हाड, जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्षा मोनिका राजळे आदी भाजपाकडून उमेदवारीसाठी प्रयत्नशील असल्याचे बोलले जाते. काहींनी दिवंगत गोपीनाथ मुंडे यांची भेटही घेतली होती. शिरसाट समर्थकांनी मागील पंधरवाड्यात बैठक घेऊन यावेळी निवडणूक लढवायची असा चंग बांधला आहे. आता भाजपाकडून कोणाला उमेदवारी मिळते याकडे लक्ष लागले आहे. खा. दिलीप गांधी कोणाच्या पारड्यात मत टाकतात यालाही महत्व आहे. देविदास खेडकर मनसेकडून उमेदवारी करू शकतात असे चित्र आहे.राष्ट्रवादीकडून आमदार चंद्रशेखर घुले यांच्या विरोधात भाजपाकडून कोणाला उमेदवारी मिळते यावर पुढील राजकीय गणित अवलंबून आहे. घुले यांना मात्र गटबाजीशी सामना करावा लागणार हे निश्चित!राष्ट्रवादीचंद्रशेखर घुले ८१८९०भाजपा प्रताप ढाकणे ६१७४६अपक्ष राजीव राजळे ४३३५१इच्छुकांचे नाव पक्षचंद्रशेखर घुले राष्ट्रवादीअशोक गर्जे भाजपाहर्षदा काकडे भाजपादेविदास खेडकर मनसे अर्जुन शिरसाठ भाजपालोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीचे राजीव राजळे यांना १२ हजारांचे मताधिक्य
भाजपाकडे रांगा, घुलेंसमोर गटबाजीचे आव्हान!
By admin | Updated: June 15, 2014 00:31 IST