अहमदनगर : जिल्ह्यात दोन आठवड्यापासून सुरू असलेल्या पावसामुळे जिल्ह्यातील आतापर्यंत झालेल्या पावसाने सरासरीची शंभरी पार केली आहे. जिल्ह्याच्या पावसाची सरासरी ४४८ मिमी इतकी आहे. आतापर्यंत ४६० मिमी इतका पाऊस झाल्याने सरासरी इतकाच म्हणजेच शंभर टक्के पाऊस झाला आहे.
ऑगस्ट महिन्याच्या अखेरीला जिल्ह्यात ९० टक्के पाऊस झाला होता. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने जिल्ह्यातील दक्षिण भागाला पावसाने चांगलेच झोडपले होते. मागच्या आणि चालू आठवड्यात पावसाचा मुक्काम कायम आहे. त्यामुळे जिल्ह्याच्या दक्षिण भागात पावसाने सरासरी पार केली. जिल्ह्याची पावसाची सरासरी ४४८.१ मिमी इतकी आहे. त्या तुलनेत जिल्ह्यात आतापर्यंत ४६०.६ मिमी इतका पाऊस झाला आहे. गतवर्षी आतापर्यंत हाच पाऊस १६७.५ मिमी इतका झाला होता. दोन आठवड्यापासून शेवगाव, पाथर्डी, अहमदनगर तालुक्यात झालेल्या पावसाने सरासरी पार केली आहे.
------------------
कोणत्या तालुक्यात किती पाऊस (टक्के)
तालुका सरासरीचे प्रमाण
अहमदनगर ९८.८
पारनेर ८९.३
श्रीगोंदा ९६.१
कर्जत ८४.७
जामखेड ८७.९
शेवगाव १२८.०
पाथर्डी १४८.४
नेवासा ९९.४
राहुरी १०५.५
संगमनेर ९४.९
अकोले १२८.२
कोपरगाव ११०.८
श्रीरामपूर ९९.९
राहाता ८०.८
एकूण १०२.८
---------
सर्वाधिक पाऊस पाथर्डीत
जिल्ह्यात आतापर्यंत सर्वाधिक १४८ मिमी इतका पाऊस पाथर्डी तालुक्यात झाला आहे. त्यानंतर अकोले आणि शेवगाव तालुक्यात १२८ मिमी इतका पाऊस झाला आहे. राहाता तालुक्यात सर्वात कमी ८० टक्के पाऊस झाला आहे, तर कर्जत तालुक्यात ८४ टक्के पाऊस झाला आहे. नाशिक विभागातही आतापर्यंत ७४ टक्के पाऊस झाला आहे. त्यामुळे नाशिक विभागापेक्षा नगर जिल्ह्यातील पावसाचे प्रमाण जास्त असल्याचे दिसते आहे.