शहरं
Join us  
Trending Stories
1
Jagannath Yatra: जगन्नाथ यात्रेला गालबोट! पुरीतील गुंडीचा मंदिराजवळ चेंगराचेंगरी, तीन भाविकांचा मृत्यू, १० जखमी
2
"...तर खूप वाईट परिणाम होतील’’, काश्मीर राग आळवत आसिम मुनीरची भारताला पुन्हा धमकी
3
Uttarakhand Cloudburst: उत्तराखंडमध्ये पावसाचा कहर, यमुनोत्री मार्गावर ढगफुटी; अनेक कामगार बेपत्ता, बचावकार्य सुरू
4
केबिनमधून जळाल्याचा वास, चेन्नईला जाणारं एअर इंडियाचं विमान मुंबईत उतरवलं
5
सिंधू जल वाटप करारासंदर्भात भारताने आंतरराष्ट्रीय लवादाचा निर्णय फेटाळला; पाकिस्तानकडून मात्र निर्णयाचे स्वागत
6
१५-६४ वयोगटातील जगातील ६% लोकसंख्या ड्रग्जच्या विळख्यात, कोकेन ‘श्रीमंतांची फॅशन’
7
४० लाख भाविकांसाठी महाप्रसाद; पुरीमध्ये अदानी फाउंडेशनची सेवा
8
वीज प्रति युनिट १ ते १.३० रुपयांनी महागणार; महाराष्ट्र वीज ग्राहक संघटनेचा दावा
9
अंतराळातून भारताचे तेजस्वी दर्शन; दररोज १६ सूर्योदय, १६ सूर्यास्त पाहातो; अंतराळवीर शुभांशू यांना पंतप्रधानांचा व्हिडीओ कॉल
10
लग्नाचं आमिष दाखवून त्याने ५ वर्षांपासून…, RCBच्या स्टार खेळाडूवर शारीरिक शोषणाचा गंभीर आरोप
11
"तुझ्या कुंडलीत आकस्मिक मृत्यू...", शेफाली जरीवालाबाबत अभिनेत्याने केलेली भविष्यवाणी खरी ठरली
12
आजचे राशीभविष्य - २८ जून २०२५, महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा, प्रकृतीचा त्रास जाणवेल, आज 'या' राशींनी घ्या काळजी
13
शक्ती कायद्याची एक वर्षानंतर झाली आठवण; केंद्राचे पत्र जुलै २०२४ मध्ये; राज्याने आता नेमली समिती
14
Panvel Crime News: प्रेमसंबंधातून जन्मलेल्या बाळाला फुटपाथवर फेकलं; २४ तासाच्या आत आरोपींना अटक
15
उद्धव ठाकरेंकडून मराठीचा राजकीय वापर, त्रिभाषा सूत्राचा अहवाल स्वीकारणारेच आज विरोधात : फडणवीस
16
पतीचं निस्वार्थ प्रेम! शेफाली जरीवालाच्या अंत्यसंस्कारावेळी परागच्या 'त्या' कृतीने वेधलं लक्ष, व्हिडीओ पाहून डोळे पाणावतील
17
मोठी बातमी: विद्यार्थिनीचा लैंगिक छळ करणाऱ्या विजय पवार, प्रशांत खाटोकरला बीड पोलिसांनी ठोकल्या बेड्या
18
बाबासाहेबांना एकच संविधान अभिप्रेत असल्याने कलम ३७० हटवण्यावर मोहर
19
चुका सुधारणार की मारच खात राहणार?
20
दहशतवादी साकिब नाचनचे दिल्लीत निधन, सिमी, इसिससाठी काम; ‘तिहार’मध्ये बिघडली प्रकृती

मुळा, प्रवरेकाठची गावे तहानली

By admin | Updated: May 5, 2016 00:02 IST

अहमदनगर : उत्तर नगर जिल्ह्याला वरदान ठरलेल्या मुळा व प्रवरा नदीकाठच्या गावांत एकेकाळी सुबत्ता नांदत होती़ यंदा मात्र प्रथमच या गावांच्या घशाला कोरड पडली आहे़

अहमदनगर : उत्तर नगर जिल्ह्याला वरदान ठरलेल्या मुळा व प्रवरा नदीकाठच्या गावांत एकेकाळी सुबत्ता नांदत होती़ यंदा मात्र प्रथमच या गावांच्या घशाला कोरड पडली आहे़ पिण्याच्या पाण्यासाठी तेथील गावकऱ्यांनी प्रशासनाकडे धाव घेतली असून, नेवासा व राहुरी तालुक्यातील गावांना टँकरने पिण्याचे पाणी पुरविण्याची वेळ ओढावली आहे़ मुळा व भंडारदरा धरणातून मराठवाड्यासाठी जायकवाडी धरणात पाणी सोडण्यात आले़ हे पाणी मुळा व प्रवरा नदीपात्रातून सोडले़ आर्वतन काळात नदीकाठच्या गावांचा पाणी उपसा बंद केल्याने पाण्याअभावी या भागातील पिके करपली़ शेती उजाड झाली़ दोन्ही नद्यांच्या काठावरील लोकांना पिण्याच्या पाण्याची समस्या जाणवू लागली आहे़ नेवासा तालुक्यातील शिरेगाव, करजगावात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे़ यापूर्वी अशी परिस्थिती कधी निर्माण झाली नाही, असे येथील शेतकऱ्यांचे म्हणणे आहे़ राहुरी तालुक्यातील दोन्ही नदीकाठच्या गावांची यापेक्षा वेगळी स्थिती नाही़ राहुरी तालुक्यातील ४५ गावांसाठी पाणी योजना सुरू आहे़ भंडारदरा धरणातून मध्यंतरी आवर्तन सोडण्यात आले होते़ यातून साठवण तलाव भरून घेतल्याने या भागातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न काहीअंशी मार्गी लागला़ याशिवाय मुळा नदीकाठच्या गावांसाठी १४ गाव पाणी योजना कार्यान्वित आहेत़ त्यामुळे तेथील गावकऱ्यांना दिलासा मिळाला आहे़शेतीचे आवर्तन रद्दप्रवरा नदीकाठच्या मडकी, बोधेगाव, प्रवरासंगम, टोका, बेलपिंपळगाव, माळेवाडी गावालाही सध्या टँकरने पाणी सुरू असून या भागातील बायाबापड्यांना रानोमाळ भटकंती करावी लागते़गोदावरी काठच्या गावांसाठी पाणी योजना कार्यान्वित आहेत़ त्यामुळे या भागातील जैनपूर वगळता इतर गावांतील ग्रामस्थांना पाणी योजनांचा दिलासा मिळाला आहे़ गोदावरी काठच्या गावांतील शेती यंदा उजाड झाली आहे़ कधी नव्हे ते या भागातील शेतकऱ्यांना दुष्काळाचा फटका बसला आहे़शेतीसाठीचे आवर्तन थांबविलेमुळा व भंडारदरा धरणातून एप्रिल, मे आणि जूनमध्ये शेतीसाठी आवर्तन मिळत असे़ त्यामुळे या भागातील पिण्याच्या पाण्याचा सुटत होता़ परंतु यंदा आवर्तन मिळालेच नाही़ त्यामुळे शेतीबरोबरच पिण्याच्या पाण्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे़