शहरं
Join us  
Trending Stories
1
लाल किल्ल्यावर स्वातंत्र्यदिनाच्या सोहळ्याला राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे का उपस्थित राहिले नाहीत? काँग्रेसने कारण दिले
2
जालना: न्यायासाठी मंत्र्याचा ताफा अडवला, मस्तवाल पोलीस अधिकाऱ्याने उडी मारून घातली लाथ; व्हिडीओ बघून येईल संताप
3
नागालँडचे राज्यपाल एल गणेशन यांचे निधन, डोक्याला दुखापत झाल्याने चेन्नईच्या रुग्णालयात झाले होते दाखल
4
धक्कादायक! आईशी प्रेमसंबंध असल्याचा संशय, मुलानं कोयत्यानं वार करत एकाला संपवले केले; दौंडमधील घटना
5
भारताची 'वंडर वुमन', ज्यांनी सैन्यातील पुरुषांना दिले प्रशिक्षण; 'मल्हार'च्या मंचावर डॉ. सीमा राव यांनी उलगडला प्रवास!
6
'स्कॅम १९९२'च्या 'हर्षद मेहता'ने अनेकदा पचवला नकार! प्रतीक गांधीने सांगितलं प्रोजेक्टमधून रिजेक्ट होण्याचं कारण, म्हणाला... 
7
हेल्थ-लाईफ इन्शुरन्स, दैनंदिन वापराच्या गोष्टी होणार स्वस्त; या गोष्टी महागणार, दिवाळीनंतर GST मध्ये मोठा बदल
8
४ तासांची भेट, एकाच खोलीतून ७००० अणुबॉम्बवर नियंत्रण; पुतिन-ट्रम्प भेटीत हायटेक सुरक्षा
9
'जरा... जरा मराठी'! गोड 'कॅडबरी'च्या तोंडी मराठीचे 'धडे'; तुम्हीही म्हणाल, खूपच भारी 
10
Agni-6 Missile : मोठी तयारी! अग्नि-६ क्षेपणास्त्र किती धोकादायक? भारत चाचणी करू शकतो, २ दिवसांचा नोटम जारी
11
पालघर: मालवाहू जहाजाची मासेमारी करणाऱ्या बोटीला धडक, चार मच्छिमार पडले समुद्रात; 15 मच्छिमारांना कुणी आणले किनाऱ्यावर?
12
बुलढाणा: जलसमाधी आंदोलन करायला गेले अन् आंदोलकच गेला वाहून; अधिकाऱ्यांसोबत कशावरून झाली बाचाबाची?
13
कोट्यवधीची रोकड, ६.७ किलो सोनं आणि..., काँग्रेसच्या आमदाराकडे सापडलं घबाड, EDची कारवाई   
14
हुमायूं मकबऱ्यात भिंत कोसळली, ७-८ जण दबले; मदत कार्य सुरू; व्हिडीओ आला समोर
15
'अमरीका ने कुत्ते पाले, वर्दी वाले-वर्दी वाले', पीओके मध्ये पाकिस्तान लष्कर प्रमुखांविरोधात घोषणा; व्हिडीओ व्हायरल
16
"चीनपेक्षाही धोकादायक म्हणजे RSS…"; ओवेसींनी साधला निशाणा, PM मोदींना विचारला एक प्रश्न
17
डोनाल्ड ट्रम्प भेटीपूर्वी व्लादिमीर पुतिन यांचा झटका; ४१५ कोटींचं लढाऊ विमान 'गायब'? 
18
ज्या चित्रपट निर्मात्याला राखी बांधली, पुढे त्याचीच पत्नी बनली ही अभिनेत्री, लग्नापूर्वीच...    
19
"भटक्या कुत्र्यांना शेल्टर होममध्ये ठेवल्याने प्रश्न सुटणार नाही, तर..."; सरसंघचालक भागवतांनी काय सुचवला पर्याय?
20
VIDEO: जय महाकाल !! आशिया कपआधी गौतम गंभीर सहकुटुंब महाकालेश्वराच्या चरणी, भस्म आरतीही केली!

पा ण्या चा पु न र्वा प र; ब च ती ची आ व श्य क ता

By admin | Updated: July 15, 2014 00:47 IST

अहमदनगर : एकेकाळी पाण्यासाठी समृद्ध शहर असलेल्या नगरवर एक दिवसाआड पाणी पुरवठ्याची नामुष्की ओढवणार आहे. मुळा धरणांतील पाणीसाठा जपून वापरण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे.

अहमदनगर : एकेकाळी पाण्यासाठी समृद्ध शहर असलेल्या नगरवर एक दिवसाआड पाणी पुरवठ्याची नामुष्की ओढवणार आहे. मुळा धरणांतील पाणीसाठा जपून वापरण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे. सढळ हाताने पाणी वापरण्याची सवय आता सोडण्याची गरज आहे. नगरमधील काही सोसायट्या,नागरिकांनी पाण्याच्या बचतीचा वेगळा आदर्श निर्माण केला आहे, यातून नागरिकांनी प्रेरणा घेण्याची गरज आहे. पाण्याचा पुनर्वापर, रेनवॉटर हार्वेस्टिंगसाठी पुढे येण्याची हीच वेळ आहे. काही सोसायट्यांनी पाण्याच्या पुनर्वापराचे प्रकल्प उभारले आहेत. सांडपाण्याचा यातून पुरेपूर वापर होत आहे, यामुळे पाणीपट्टीत सवलत तर मिळणार आहेच, त्याचबरोबर पाण्याची बचतही होणार आहे. पाऊस आला नाही तर पाणी कपातीची आपत्ती ओढवणार आहे. त्यावेळी पाणी बचतीबाबत चर्चा होते. विविध उपाय सुचविले जातात. मात्र, पाऊस सुरू झाला, की सगळे मनसुबे वाहून जातात. आता मात्र आपण धडा घेण्याची वेळ आली आहे. नगर वाढतंय, लोकसंख्या वाढतीय. मात्र, नगरसाठीची पाणीसाठवण क्षमता मात्र वाढणार नाही. उपलब्ध पाणीच आपल्याला पुरवून वापरावे लागणार आहे, त्यामुळे आतापासूनच सुरुवात करावी लागणार आहे. महापालिकेकडून उपाययोजना होतील म्हणून गप्प बसून चालणार नाही. वैयक्तिक पातळीवरही आपण पाणीबचतीसाठी काळजी घ्यायला हवी. नगरकरांनो लक्षात ठेवा...खरे तर आपण पाण्याशी नीट वागत नाही. अमर्याद वाढणारी लोकसंख्या आणि पाण्याच्या बेबंद वापराची सवय यामुळे पाण्याची टंचाई सर्वांनाच जाणवू लागली आहे़ त्यात पावसाने ओढ दिल्याने नगरकरांवर आता पाणी बचत करण्याची सक्ती करण्याची वेळ आली आहे़ आपल्या सवयी बदलाव्या लागणार आहेत़ या सवयी बदलण्यासाठी छोटे-छोटे उपाय आपण करू शकतो़ सामूहिक जबाबदारी सार्वजनिक ठिकाणी असलेल्या नळकोंडाळ्यांची तातडीने दुरुस्ती करायेत्या पावसाळ््यात छतावर पडणाऱ्या पाण्याचे संकलन करून त्याचे पुनर्भरण करण्यासाठी पुढाकार घ्याजुने जलस्रोत व कूपनलिकांचे पुनरुज्जीवन आवश्यक आहे. नैसर्गिक जलस्रोत व टेकड्यांवरील अतिक्रमण रोखा. वृक्षारोपण करून पुन्हा ‘ग्रीन सिटी’ ही ओळख निर्माण करावी. वैयक्तिक जबाबदारी नागरिकांनी कपडे व भांडी धुताना पाण्याचा कमीत कमी वापर करावा. आंघोळ व दाढी करताना आवश्यक तेवढचे पाणी घ्यावे. नळाच्या पाण्याने गाडी धुण्यापेक्षा बादलीत पाणी घेऊन ओल्या फडक्याने गाडी पुसावी. उद्यानासाठी पिण्याच्या पाण्याचा वापर न करता पुनर्प्रक्रिया केलेल्या पाण्याचा उपयोग करावा.नैसर्गिक साधनसंपत्तीचे आपण विश्वस्त असल्याचे भान ठेवून काही व्यक्ती, संस्था, गृहनिर्माण सोसायटी यांनी यापूर्वीपासूनच पाणी बचतीच्या उपाययोजना सुरू केल्या आहेत. त्यामध्ये छतावरील पाण्याचे संकलन, पुनर्भरण व पुनर्वापरासाठीचे प्रयोग यशस्वीपणे राबविले आहेत. त्यांच्या कामातून अनेकांना प्रेरणा मिळेल. ‘लोकमत’च्या माध्यमातून त्यांचे कार्य समाजासमोर आणून त्याला बळ देण्याचा आमचा मानस आहे. आपल्या उपक्रमाची/प्रयोगाची माहिती ‘लोकमत’ कार्यालयात पाठवा. पत्ता : लोकमत भवन, पत्रकार चौक, नगर-मनमाड रोड, सावेडी, अहमदनगर. फोन (०२४१) २४२९९०२,२४२९७११ (ई-मेल : ल्ल्लंँ१’ङ्म‘ें३@ॅें्र’.ूङ्मे) - संपादकआपत्कालीन परिस्थितीत पाणी बचत, पाण्याचा पुनर्वापर, रेनवॉटर हार्वेस्टिंग व जुन्या जलस्रोताचे पुनरुज्जीवन करण्यासाठी नगरकरांनी पुढाकार घेतला पाहिजे.’’- चंद्रशेखर करवंदे,सावेडी, आंघोळ बादलीत पाणी घेऊन केल्यास : १८ लीटरशॉवरखाली : १०० लीटरदाढीनळ सोडून दाढी केल्यास : १० लीटरमग घेऊन : १ लीटरब्रशनळ सोडून केल्यास :१० लीटरमग घेऊन : १ लीटरकपडे नळाखाली :११६ लि.बादलीचा वापर केल्यास : ३६ लीटरमोटार पाईप वापरल्यास : १०० लि.बादलीचा वापर केल्यास : १८ लीटरहात धुण्यासाठीनळाखाली : १० लीटरमग घेऊन : अर्धा लीटरशौचविधीफ्लश केल्यास : २० लीटरबादलीचा वापर केल्यास : ६ लीटर