शहराध्यक्ष चौगुले यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी मुख्याधिकारी काकासाहेब डोईफोडे यांची भेट घेऊन निवेदन दिले. यावेळी युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष अमृत गायके, माजी नगरसेवक सुरेश आरने, उमेश शेजवळ, मदन मोकाटे, अॅड. अविनाश शेजवळ, मोसिन सय्यद, समीर शेख उपस्थित होते.
महाराष्ट्र शासनाच्या माझी वसुंधरा अभियानात प्रथम क्रमांक मिळविलेल्या शिर्डी नगरपंचायतने बगिचा विभागात काम करणाऱ्या कामगारांचे चार महिन्यांचे पगार थकविले असून त्यांच्यावर उपासमारीची वेळ आलेली आहे. एकीकडे माझी वसुंधरा अभियानात नंबर एकचा पुरस्कार मिळाल्याने शिर्डी नगरपंचायतचे सर्वत्र कौतुक केले जात आहे. तर दुसरीकडे ज्या कामगारांनी प्रामाणिकपणे ड्युटी करत वृक्ष संवर्धन करून आपली सेवा बजावली व त्यामुळेच हा पुरस्कार शिर्डी नगर-पंचायतला मिळाला त्याच गरीब कामगारांचे पगार रखडवले जात आहे. शिर्डी नगरपंचायत म्हणजे नाव मोठे आणि लक्षण खोटे असून सत्ताधाऱ्यांच्या नाकर्तेपणामुळे हे निर्माण झाल्याचा आरोप चौगुले यांनी केला.
मुख्याधिकाऱ्यांनी यात तातडीने याबाबत लक्ष घालून कामगारांचे रखडलेले वेतन अदा करावे, अन्यथा नगरपंचायत समोर आंदोलनाचा इशारा देण्यात आला. यावेळी राजू बरडे, सुवरनेश साबळे, मोसीन खान, विजय पवार, दीपक पवळे, राजमहम्मद शेख, आरबाज कादरी, राहुल गायकवाड, शंकर बर्डे, सुनील बर्डे, अर्जुन पवार, गणेश मुळे, शकील सय्यद,योगेश निर्भवने, विशाल पवार, विशाल बर्डे, किरण बर्डे, दत्ता त्रिभुवन, अनिस पठाण,अनुज गंगवाल, कमलेश जाधव, अमोल गिरमे, संतोष वाघमारे, कृष्णा गायकवाड आदी उपस्थित होते.