राहुरी : एका वानर टोळीच्या प्रमुखाने केलेल्या हल्ल्यात दुसऱ्या वानर टोळीतील एकाचा मृत्यू झाला़ अनिल कोरडे यांच्या घरासमोर दोघा वानरांचे युद्ध सुरू झाले़ अनेकांनी दोघांचे भांडणे सोडविण्याचा प्रयत्न केला़ मात्र त्यांना यश आले नाही़ अखेर एका वानराच्या कमरेला जखम झाली़ त्यात मोठा रक्तस्त्राव झाल्याने वानराला मृत्यू झाला. त्यानंतर इतर वानरांनी पलायन केले़राहुरी परिसरात वानरांची संख्या कमी होत आहे़ पूर्वी राहुरी येथे मोठ्या प्रमाणावर वानरे होती़ फळांचे प्रमाण कमी झाल्याने वानरांनीही स्थळांतर केले. भांडणे झालेले दोन्हीही नर जातीचे वानर होते़ (तालुका प्रतिनिधी)
वानरांच्या मारामारीत एकाचा मृत्यू
By admin | Updated: June 24, 2014 00:04 IST