योगिराज खोंडे: महापालिका आयुक्त विलास ढगे यांच्यावर अन्यायअहमदनगर : ऐन दुष्काळाच्या काळात आणि तेदेखील कालावधी पूर्ण झालेला नसताना वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्या होणे अशोभनीय असून, हा एकप्रकारे त्यांच्यावर झालेला अन्याय आहे़ विशेष म्हणजे स्वच्छानिवृत्तीचा अर्ज देऊनही महापालिका आयुक्त ढगे यांची बदली झाली, हे सरकारला शोभत नाही, असा आरोप राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेचे अध्यक्ष योगिराज खोंडे यांनी प्रसिद्धीपत्रकारद्वारे केला आहे़ जिल्हाधिकारी अनिल कवडे यांच्यासह जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी शैलेश नवाल आणि महापालिका आयुक्त विलास ढगे यांची बदली झाल्याचे समजते़ सध्या जिल्ह्यात भीषण दुष्काळ स्थिती निर्माण झाली आहे़ त्यावर मात करण्यासाठी अनुभवी अधिकाऱ्यांची गरज असताना सरकारने जिल्हाधिकारी अनिल कवडे यांची बदली केली़ कार्यकाल पूर्ण झालेला नसतानाही त्यांची बदली करण्यात आली होती़ कवडे यांची बदली पालकमंत्री राम शिंदे यांनी रद्द केली़ त्यांच्या भूमिकेचे संघटनेकडून स्वागत आहेत़ मात्र, ढगे यांच्या बदलीसाठी त्यांनी प्रयत्न केले नाहीत़़ ते जिल्ह्याचे पालकमंत्री असून, त्यांनाच बदल्यांची माहिती नाही, हे विशेष़ ढगे यांनी मॅटमध्ये धाव घेतल्यास त्यांना न्याय मिळेल, असे खोंडे यांनी त्यांच्या निवेदनात नमूद केले आहे़(प्रतिनिधी)नवाल हँगिंग, जिल्हाधिकारी, आयुक्तांना आदेशाची प्रतीक्षाजिल्हाधिकारी अनिल कवडे यांची बदली रद्द केल्याची घोषणा पालकमंत्री राम शिंदे यांनी केली होती़ बदलीचे आदेश सोमवारी येतील, असे त्यांनी कर्जत येथील एका कार्यक्रमात जाहीर केले होते़ मात्र, दोन दिवस उलटून देखील कवडे यांची बदली रद्द केल्याचे पत्र कवडे यांना प्राप्त झाले नाही़ त्यामुळे जिल्ह्याचे जिल्हाधिकारी कोण? असा प्रश्न उपस्थित होत आहे़ जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदाचा पदभार नांदेडचे सहायक जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांनी स्वीकारला आहे़ नगर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शैलेश नवाल यांची पालघर जिल्हाधिकारी पदी नियुक्ती झाली आहे़ नियुक्तीचे अधिकृत पत्र नवाल यांना प्राप्त झाले आहे़ मात्र पालघरचे जिल्हाधिकारी यांना बदलीचे आदेश मिळाले नाहीत़ त्यामुळे नवालही सध्या हँगिंग असल्याचे चित्र सध्या तरी आहे़महापालिका आयुक्तपदी रवींद्र बिनवडे यांची नियुक्ती झाली़ परंतु, महापालिका प्रशासनास याबाबत कोणतेही आदेश प्राप्त झाले नाहीत़ त्यामुळे मनपा आयुक्त विलास ढगे यांना आदेशाची प्रतीक्षा आहे़
अधिकाऱ्यांच्या बदल्या नियमबाह्य
By admin | Updated: May 3, 2016 23:50 IST