लोकमत न्यूज नेटवर्क
राहुरी : शहरासह तालुक्यात कोरोनाचा उद्रेक वाढला आहे. १ फेब्रुवारीपासून तब्बल तालुक्यात ४४९ रुग्ण संख्या वाढ झाली आहे. नागरिक मात्र कोणत्याही नियमांंचे पालन करताना दिसत नाही. जर नियमांचे पालन केले नाहीतर प्रशासनाकडून सुद्धा कडक निर्बंध लावण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
राहुरी तालुक्यात जानेवारी २०२१ पर्यंत कोरोनाचे रुग्ण नगण्य होते. परंतु नागरिकांनाही कोरोना संपला अशा आविर्भावात बिनधास्तपणे वागणे सुरू केले. लग्न, वाढदिवस, पार्ट्या समारंभ, हॉटेल, मॉल, दुकानात खरेदी, बाजार, रस्त्यावरील गर्दी केली. यात कोणत्याही प्रकारचे सोशल डिस्टन्स व मास्कचा वापर नागरिकांकडून होत नव्हता. यामुळे कोरोना कमी होण्याऐवजी आता तो हळूहळू वाढ आहे. राहुरी शहरासह तालुक्यात १ जानेवारीपर्यंत क्वचित एखादा रुग्ण कोरोना बाधित निघत होता. फेब्रुवारीपासून मात्र यात दिवसेंदिवस दिवस वाढ होत गेली. १ फेब्रुवारीपासून ते २२ मार्च या ५० दिवसात जवळपास ४४९ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण बाधित झाले आहेत. यामध्ये राहुरी शहरात जवळपास १६२ कोरोना पॉझिटिव्ह झाले आहे. फेब्रुवारी महिन्यात ७४ कोरोना रुग्ण होते. मार्च २१ तारखेपर्यंत २७५ रुग्ण आढळून आले आहे. २० मार्च रोजी तब्बल तालुक्यात ५० रुग्ण यामध्ये राहुरी शहरातील २१ रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आले होते. २२ मार्च रोजी पुन्हा तालुक्यात ५६ तर राहुरी शहरात २० रुग्ण पॉझिटिव्ह आले.
.....
कोरोना रुग्णाच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत गेल्यास पुन्हा राहुरी तालुका पुन्हा लॉकडाऊन होण्याची शक्यता आहे. राहुरी नगरपालिका, पोलीस व होमगार्ड प्रशासन पुन्हा एकदा सतर्क झाले आहे. रस्त्यावरून विना मास्क फिरणाऱ्यांकडून २०० रुपये दंड वसूल करण्यात येत आहे. राहुरी नगरपालिकेचे राजेंद्र जाधव, सुभाष बाचकर, सुरेंद्र आंधळे, योगेश शिंदे, वाहतूक पोलीस शाखेचे पोलीस मनोज राजपूत, अशोक कोलगे, आलम शेख, होमगार्ड महेश सत्रे, अशोक तुपे हे यासाठी सहकार्य करीत आहेत.
...
दर दहा दिवसाला होणारी रुग्णवाढ
१ ते १० फेब्रुवारी- ०
११ ते २० फेब्रुवारी- १४
२१ ते २८ फेब्रुवारी- ८
१ ते १० मार्च -३८
११ ते २२ मार्च ५६.
....
आजअखेर एकूण केसेस-३०४५
उपचार सुरू असलेले-१३९
उपचार पूर्ण झालेले-२८५०
मृत्यू-५६
क्वारंटाईन सद्यस्थिती विद्यापीठ-३२
...
कोरोनाचे संकट पूर्णपणे थांबलेले नाही. घाबरून न जाता नागरिकांनी स्वत:ची काळजी घ्यावी. सोशल डिस्टन्स व सॅनिटायझरचा वापर करावा. कामाशिवाय बाहेर फिरू नये.
डॉ. दीपाली गायकवाड, तालुका वैद्यकीय अधिकारी, राहुरी.