शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
3
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
4
'फक्त एकाला मारणार, जो लाखांच्या...!'; लॉरेंस बिश्नोई गँगची पाकला धमकी, कुणावर निशाणा?
5
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
6
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
7
'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून द्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा आणि शेअर करा आकर्षक शुभेच्छा पत्रं!
8
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
9
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
10
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
11
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
12
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)
13
मैत्रिणीचे लग्न आटोपून घरी येताना अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, ९ जणांना अटक
14
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
15
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
16
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
17
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
18
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
19
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे

डीएडच्या तुलनेत बीएडला प्रवेश घेणाऱ्यांची संख्या वाढली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2021 04:25 IST

संगमनेर : शिक्षक प्रशिक्षण अभ्यासक्रमांकडे पाहण्याची नकारात्मकता सध्या बदलली असली तरी डीएड अभ्यासक्रमाच्या तुलनेत बीएड अभ्यासक्रमाला प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांची ...

संगमनेर : शिक्षक प्रशिक्षण अभ्यासक्रमांकडे पाहण्याची नकारात्मकता सध्या बदलली असली तरी डीएड अभ्यासक्रमाच्या तुलनेत बीएड अभ्यासक्रमाला प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या यंदा वाढली आहे. राज्यात बीएड महाविद्यालयांची संख्या गेल्या वर्षी ४९६ इतकी होती. राज्यभरातील बीएड महाविद्यालयांमध्ये यंदाच्या वर्षी ३२ हजारांपेक्षा अधिक जागांसाठी पाच वर्षांनंतर पहिल्यांदाच ७६ हजारांहून अधिक विद्यार्थ्यांनी प्रवेशासाठी अर्ज केले आहेत.

शिक्षक प्रशिक्षण अभ्यासक्रमतज्ज्ञ, शिक्षण प्रसारक संस्थेच्या शिक्षणशास्त्र महाविद्यालयातील सहायक प्राध्यापक राजू शेख यांनी याबाबत माहिती दिली. राज्यातील शिक्षक सेवकांची पदे भरण्यासाठी नुकतीच महाराष्ट्र शासनाने शिक्षक भरतीसंदर्भात कार्यवाही सुरू केल्याचा सकारात्मक परिणाम दिसून येतो आहे. गेल्या वर्षी बीएड अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी ४६ हजार ८१७ इतके अर्ज आले होते. त्यापैकी ४३ हजार ९८३ अर्ज स्वीकारले गेले, तर ३९ हजार ८३५ अर्ज मंजूर करण्यात आले होते. गेल्या वर्षी बीएड महाविद्यालयांची संख्या ४९६ इतकी होती. या महाविद्यालयांतील निर्धारित जागांची संख्या ३२ हजार २९० इतकी असताना २९ हजार ५३३ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला होता.

शिक्षक प्रशिक्षणासाठी सर्वप्रथम सीईटी देणे बंधनकारक आहे. शिक्षण प्रशिक्षणासाठी असलेल्या परीक्षेसाठी यंदा बीएड जनरल स्पेशल अभ्यासक्रमासाठी ७६ हजारपेक्षा अधिक प्रवेश परीक्षा अर्ज भरले गेले आहेत, तसेच एमएड अभ्यासक्रमासाठी ३ हजार ९७४ पेक्षा अधिक, बीएड, एमएड या संयुक्त अभ्यासक्रमासाठी १ हजार ५०७, तर चार वर्षीय बीएड अभ्यासक्रमासाठी ४ हजार ९०० पेक्षा अधिक अर्ज प्राप्त झाले आहेत. एमएड व चारवर्षीय बीएड शिक्षक प्रशिक्षणाची महाविद्यालये तुलनेने राज्यात कमी आहेत.

सीईटी परीक्षेसाठी आवेदन भरणाऱ्या विद्यार्थ्यांची सर्वांत अधिक पसंती दोनवर्षीय बीएड जनरल अभ्यासक्रमासाठी नोंदविण्यात आली आहे. पदवी व पदव्युत्तर पदवी व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी सीईटी परीक्षा घेतली जाऊन गुणांच्या आधारे विद्यार्थ्यांना संबंधित अभ्यासक्रमासाठी प्रवेश दिला जाणार आहे.

-------------

सहा हजार १०० पदे भरली जाणार

राज्यात सुमारे सहा हजार १०० शिक्षण सेवकांची पदे भरली जाणार आहेत. गुणवत्ताधारक उमेदवारांसाठी पवित्र पोर्टलच्या माध्यमातून पारदर्शकपणे ही प्रक्रिया राबवण्यात येणार आहे. राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या, खासगी व्यवस्थापनाच्या अनुदानित, अंशतः अनुदानित व विनाअनुदानित, तसेच अनुदानास पात्र घोषित केलेल्या प्राथमिक, उच्च प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळांमधील, तसेच शासकीय व अनुदानित अध्यापक पदविका विद्यालयातील शिक्षकांच्या रिक्त पदांवर भरती केली जाणार आहे. सर्व उमेदवारांना निवडीची समान संधी मिळावी व शिक्षण सेवक पदांसाठी उच्च गुणवत्ताधारक उमेदवारांची निवड होण्याच्या दृष्टीने शिक्षण सेवकांची भरती ‘अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी’ या परीक्षेत मिळालेल्या गुणांच्या आधारे उमेदवारांची मुलाखत घेऊन अंतिम निवड करण्यात येणार आहे. यामुळे शिक्षक होऊ इच्छिणाऱ्यांच्या संख्येत वाढ झाली असल्याचे प्राध्यापक शेख यांनी सांगितले.

--------------

महाराष्ट्रात दोन वर्षांच्या बीएड अभ्यासक्रमासाठी सीईटी सेलकडे अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या गेल्या वर्षीच्या तुलनेत दुप्पट असल्याचे नोंदीवरून लक्षात येते. गेल्या वर्षी ज्या विद्यार्थ्यांना प्रवेश मिळाला नव्हता, अशा विद्यार्थ्यांच्या संख्येत यावर्षी मोठ्या प्रमाणात वाढ होण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रात शिक्षक भरतीच्या पार्श्वभूमीवर शिक्षक प्रशिक्षण अभ्यासक्रमाकडे विद्यार्थ्यांचा कल वाढलेला दिसून येत आहे.

-डॉ. भालचंद्र भावे, प्राचार्य, शिक्षणशास्त्र महाविद्यालय, संगमनेर

-------------

२०११ साली डीएड अभ्यासक्रमाचे प्रशिक्षण पूर्ण केले. मात्र, घेतलेल्या अभ्यासक्रमाच्या अनुषंगाने नोकरी अजूनही मिळालेली नाही. शासनाच्या शिक्षण भरतीची प्रक्रिया प्रभावी नसल्या कारणाने माझ्यासारखे अनेक डीएड प्रशिक्षण पूर्ण केलेले तरुण बेरोजगार आहेत. अनेक जण नोकरीच्या शोधात आहेत. मिळेल ते काम करण्याची वेळ अनेकांवर आहे.

-ज्ञानेश्वर शिंदे, रा. संगमनेर

-------------

star 1160