निघोज : पारनेर तालुक्यातील निघोज येथील मळगंगा देवीला हळद लावण्याचा कार्यक्रम पार पडला. अगदी मोजक्याच महिलांच्या उपस्थितीमध्ये देवीला हळद लावण्यात आली. दरवर्षी हा सोहळा मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. मात्र, कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे मळगंगा यात्रौत्सव गेल्या वर्षीप्रमाणे याही वर्षी रद्द करण्यात आल्याची माहिती मळगंगा ग्रामीण विकास ट्रस्टचे सचिव शांताराम कळसकर यांनी दिली. सर्वांनी स्वतःची व आपल्या परिजनांची काळजी घ्या. महत्त्वाच्या कामाव्यतिरिक्त बाहेर फिरू नका. मास्क, सॅनिटायझरचा योग्य वापर करा. कोरोनासंबंधीच्या अधिकृत माहितीशिवाय अफवांवर विश्वास ठेवू नका, असे आवाहन मळगंगा ग्रामीण विकास ट्रस्टचे कार्याध्यक्ष प्रभाकरराव कवाद, उपाध्यक्ष शांताराम लंके, सचिव शांताराम कळसकर, सरपंच चित्रा वराळ, उपसरपंच माउली वरखडे, माजी सरपंच चंद्रकांत लामखडे, ठकाराम लंके यांनी केले आहे.
निघोजच्या मळगंगा देवीची याही वर्षी रद्द
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2021 04:25 IST