येथील यशोधन कार्यालयात काँग्रेस बळकटीकरण सप्ताहास प्रारंभ करण्यात आला. त्या वेळी आमदार कानडे बोलत होते. या वेळी जिल्हा समन्वयक ज्ञानदेव वाफारे, जिल्हा कार्याध्यक्ष सचिन गुजर, इंद्रनाथ थोरात, अरुण नाईक, ज्ञानेश्वर मुरकुटे, ॲड. समीन बागवान, विष्णुपंत खंडागळे, बाबासाहेब कोळसे आदी उपस्थित होते.
आमदार कानडे म्हणाले, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात हे काँग्रेसचे राज्याचे नेतृत्व करत आहेत. त्यांच्या कार्याचा उल्लेख आदरपूर्वक केला जातो, त्यांच्याच बळावर आज राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन होऊन अतिशय चांगल्या प्रकारे काम करत आहे. काँग्रेस बळकटीकरण सप्ताहानिमित्त तालुक्यात मोठ्या प्रमाणावर जनतेच्या कल्याणाकरिता कार्यक्रम राबविले जाणार आहेत. असंघटित कामगारांचा मेळावा, टाकळीभान येथे भूमिहीन व बेघर नागरिकांचा मेळावा, बेलापूर व उक्कलगाव येथे शेतकरी मेळाव्याचे आयोजन केले जाणार आहे.
सचिन गुजर यांनी मंत्री थोरात यांच्या कार्याचे महत्त्व कार्यकर्त्यांना सांगितले. पक्ष बळकटीकरण सप्ताह जल्लोषात व शांततामय वातावरणात साजरा करण्याचे आवाहन त्यांनी केले. या वेळी युवक शहराध्यक्ष अभिजित लिप्टे, विद्यार्थी काँग्रेसचे सचिव अक्षय नाईक, एनएसयूआयचे जिल्हा कार्याध्यक्ष आकाश क्षीरसागर यांनी मनोगत व्यक्त केले.
----------
फोटो ओळी : लहू कानडे
काँग्रेस पक्षाच्या बळकटीकरण सप्ताह प्रसंगी बोलताना आमदार लहू कानडे.
---------