अहमदनगर : नगर तालुक्यातील आठवड गावाला विविध पुरस्कार मिळवून देण्यात, तसेच गावाला स्मार्ट व आदर्श बनविण्यात ग्रामसेवक शहाजी नरसाळे यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले. त्यांनी गावात आदर्श काम उभे केले, असे जिल्हा परिषद सदस्य संदेश कार्ले यांनी सांगितले.
आठवड येथील ग्रामसेवक शहाजी नरसाळे यांची आठवड येथून निमगाव घाणा (ता. नगर) येथे बदली झाली. त्याबद्दल त्यांचा आठवड येथे निरोप समारंभात सत्कार करण्यात आला. यावेळी इंजिनिअर प्रवीण कोकाटे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती बाबासाहेब गुंजाळ, सरपंच राजेंद्र मोरे, उपसरपंच भाऊसाहेब लगड, अशोक चोभे, जिवा लगड, सुनील लगड, बाळासाहेब गुंजाळ, उद्योजक दाताळ, किशोर मोरे, राजेश जाधव, अक्षय लगड, बबन मोरे, जया गाडे, राजेश जाधव, जिवा लगड, भाऊसाहेब लगड, सुनील लगड, अतुल लगड आदी उपस्थित होते. गुंजाळ म्हणाले, नरसाळे यांनी आठवड येथे सलग ८ वर्षे सेवा केली. गावातील विविध विकासकामे पार पाडण्यात महत्त्वपूर्ण योगदान दिले. गावाला लाभलेले ते सर्वोतम ग्रामसेवक होते, असे त्यांनी सांगितले.
२८ शहाजी नरसाळे