शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताबद्दल लिहिली भलीमोठी पोस्ट; मग मोदी काय म्हणाले? वाचा
2
Balendra Shah: काठमांडूचे 'रॅपर', महापौर बालेंद्र शाह होणार नेपाळचे नवे पंतप्रधान?
3
नेपाळमध्ये लष्कराने कमान सांभाळली, एअर इंडिया-इंडिगोच्या विमान उड्डाणे रद्द
4
कोणत्या खासदारांनी क्रॉस व्होटिंग केली? सर्वत्र चर्चा; महाराष्ट्रासह 'या' राज्यातील खासदार संशयाच्या भोवऱ्यात
5
आता टेन्शन फ्री होईल मध्यम वर्ग; या ५ सरकारी स्कीम करतील तुमची रिटायरमेंट आणि सेव्हिंग सुपर सेफ, पाहा कसं?
6
Asia Cup 2025: सूर्यकुमारने पाकिस्तानच्या कर्णधाराशी हात मिळवला की नाही? Video झाला व्हायरल
7
Crime: संतापजनक! चालत्या कॅबमध्ये विद्यार्थिनीसमोर हस्तमैथुन, चालकाला अटक!
8
Genz Protests Nepal: तरुणाईच्या आगीत नेपाळ स्वाहा! नेत्यांच्या भ्रष्टाचाराने जेरीस, सोशल मीडिया बंदीने ओतले तेल
9
हैदराबाद गॅझेटियरनंतर सरकारची नवी हालचाल; मराठा उपसमितीने उचलले महत्त्वाचे पाऊल 
10
"मी भाऊ कदमकडून खूप काही शिकलो", मनोज वाजपेयीकडून अभिनेत्याचं भरभरुन कौतुक, म्हणाला...
11
भारताच्या 'आयटी'वर नवे संकट! 'या' कंपन्यांवर २५ टक्के कर लावण्याचा अमेरिकी खासदाराचा प्रस्ताव
12
आजचे राशीभविष्य - ९ सप्टेंबर २०२५: जिभेवर ताबा ठेवावा लागेल, वरिष्ठांशी वाद होण्याची शक्यता
13
'भारत-अमेरिका पक्के मित्र, व्यापार करारावर चर्चा सुरू'; ट्रम्प यांच्या पोस्टला पंतप्रधान मोदींचे उत्तर
14
अग्रलेख: भडकलेली 'जेन-झी'! भारताला अधिक सजग राहावे लागणार
15
टोळीयुद्धाने हादरली नवी मुंबई; गुंड राजकुमार म्हात्रेला मारहाण, खुटारीमध्ये हवेत गोळीबार
16
धुमसते नेपाळ : संसद पेटविली; सर्वोच्च न्यायालय आणि अॅटर्नी जनरल कार्यालयात तोडफोड
17
मालेगाव २००८ बॉम्बस्फोट: प्रज्ञा ठाकूर, पुरोहितसह ६ जणांच्या मुक्ततेला उच्च न्यायालयात आव्हान
18
विशेष लेख: उपराष्ट्रपतिपदाच्या खुर्चीत 'खेळात न उतरणारा खेळाडू'
19
Apple Awe Dropping Event : Apple नं लाँच केला सर्वात स्लीम iPhone 17 Air! जाणून घ्या, किंमत अन् संपूर्ण स्पेसिफिकेशंस
20
Asia Cup 2025: कधी अन् कुठं पाहता येईल IND vs UAE मॅच? कसा आहे दोन्ही संघांमधील हेड-टू-हेड रेकॉर्ड?

मुळा, भंडारदरा धरणाची पाणीपातळी खालावली

By admin | Updated: June 28, 2014 01:12 IST

अहमदनगर: जिल्ह्यावरील पाणी संकट तूर्तास टळले असले तरी मान्सूनमध्ये सुधारणा न झाल्यास जिल्ह्यावर पाणी संकटाची शक्यता आहे़

अहमदनगर: जिल्ह्यावरील पाणी संकट तूर्तास टळले असले तरी मान्सूनमध्ये सुधारणा न झाल्यास जिल्ह्यावर पाणी संकटाची शक्यता आहे़ मुळा व भंडारदरा धरणातून दररोज प्रत्येकी १२ व २ दशलक्ष घनफूट पाणी उपसा होत असून, काटकसर न केल्यास अखेरच्या टप्प्यात तळातील पाणी घेण्याशिवाय पर्याय राहणार नाही़ हे पाणी गाळमिश्रित असल्याने पाणीपुरवठ्यात अडथळा निर्माण होण्याची भीती व्यक्त होत आहे़जूनचा अखेरचा आठवडा सुरू झाला तरी पावसाचा पत्ता नाही़ खबरदारीचा उपाय म्हणून शेतीचे पाणी बंद करण्यात आले़ जलसंपदा विभागास सतर्कतेचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत़ उन्हाळी आवर्तन देऊन मुळाधरणात आज अखेर ६१८ दलघफू साठा आहे़ तर भंडारदरात ६८१ दलघफू उपयुक्त पाणीसाठा आहे़ भंडारदरा व मुळा जलाशयातून लाभक्षेत्रातून फक्त पाणी योजनांव्दारे पाणी उपसा होत आहे़ नगर शहरासह उत्तर नगर जिल्ह्याला पाणीपुरवठा होत असून, पाणी योजना व बाष्पीभवन, असे मिळून दररोज १२ दलघफू पाणी उपसा होत आहे़ उपसा अत्यल्प असला तरी धरणातील पाणीसाठ्याच्या तुलनेत ते प्रमाण अधिक आहे़ त्यामुळे मुळा रिक्त होण्याच्या मार्गावर असल्याने प्रशासकीय यंत्रणाही धास्तावली आहे़ जिल्ह्यातील मुळा व भंडारदरा भंडारदरा धरणाची यापेक्षा वेगळी स्थिती नाही़ भंडारदरा जलाशयातून श्रीरामपूर शहरासह इतर शहरांना पाणीपुरवठा होतो़ भंडारदरातून पिण्यासाठी १३ जुलै रोजी आवर्तन सुटणार आहे़ पाणी उपसा अधिक झाल्यास तळातील पाणी घ्यावे लागेल़ तळातील पाणी गाळमिश्रित असेल़ त्यामुळे पाणी उपसा करण्यात अडचण येईल़ ती येऊ नये यासाठी पाण्याची काटकसर करण्याची गरज असल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे़नगरला दीड महिना पुरेल एवढा पाणीसाठाअहमदनगर : शेती अवर्तन सोडले नाही आणि बाष्पीभवन कमी झाले तर शहराला जवळपास दीड महिने पाणी टंचाई जाणवणार नाही, इतके पाणी मुळा धरणात असल्याचा दावा महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाने केला आहे. त्यामुळे शहराला जलसंकटाची धग जाणवणार नाही. दीड महिन्याच्या काळात पाऊस पडून धरणात नव्याने पाण्याची आवक होईल. शहरवासियांनी काळजी करू नये, असे आवाहन महापालिकेने केले आहे.नगर शहर आणि पाच ग्रामपंचायत हद्दीतील जवळपास साडेचार लाख लोकांना महापालिकेच्या पाणी पुरवठा योजनेतून पाणी पुरवठा केला जातो. नगर शहराची लोकसंख्या आणि पाण्याची गरज लक्षात घेता शहरात दिवसाआड तर केडगावला दर तिसऱ्या दिवशी पाणी पुरवठा केला जातो. मुळा धरणातील पाण्यावर शहराची तहान भागविली जाते. मुळानगर, विळद व नागापूर येथे एकूण ५६० अश्वशक्तीचे पंप त्यासाठी अहोरात्र सुरू असतात. धरणात महापालिकेने दोन विहिरी खोदलेल्या आहेत. सध्या या विहिरी पाण्याखाली आहेत. धरणातील पाण्याची पातळी गुरूवार अखेर १ हजार ७५५.२० फूट इतकी आहे. १ हजार ७५२ फूट पाणी पातळीपर्यंत शहराच्या पाण्यावर कोणताही परिणाम होत नाही. त्याखाली पाणी पातळी गेली की पाण्याच्या उपसावर हळूहळू परिणाम होतो. पाण्याची पातळी कमी झाली की नगर शहरासह गवळीवाडा, विळद, वाकोडी, देहरे ग्रामपंचायतीच्या पाणी कपातीचा निर्णय घ्यावा लागतो. गतवर्षी ओढावले होते संकटगतवर्षी १७५२ फूटाच्याखाली पाणी पातळी गेली होती. त्यामुळे शहरावर जलसंकट ओढावले होते. यंदा मात्र तशी वेळ येईल असे वाटत नसल्याचे पाणी पुरवठा विभागाचे प्रमुख परिमल निकम यांनी सांगितले. नगर शहर व चार ग्रामपंचायत हद्दीतील लोकसंख्या : ४ लाख ५० हजारशहराची गरज :८० दशलक्ष लीटरधरणातून होणारा उपसा : ७० दशलक्ष लीटरप्रत्यक्षात पुरवठा होणारे पाणी : ६४ लशलक्ष लीटरशहरातील नळजोड : ४६ हजार ७००