पारनेर : पारनेर तालुका ग्रामीण खो-खो स्पर्धेत मुलांच्या गटात मुलिकादेवी विद्यालय, निघोज व मुलींच्या गटात नागेश्वर मित्र मंडळाने विजेतेपद पटकावले. निघोज येथे होणाऱ्या जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी यातून संघ निवडला जाणार आहे.पारनेर तालुका क्रीडा संकुलावर बुधवारी सकाळी तालुकाध्यक्ष बापूराव होळकर, सोमनाथ वाकचौरे, दिलीप दुधाडे, सुनील गायकवाड, ऋषिकेश औटी, एकनाथ आंबेकर यांच्या हस्ते स्पर्धेचे उदघाटन झाले.मुलींचा गटमुलींच्या गटात निघोजच्या अर्चना रसाळ, रेश्मा बोदगे, दीपाली डुबे, प्रणिता लोखंडे, कविता रसाळ, रूपाली घोडे, तृप्ती कवाद, अश्विनी लोखंडे, शितल गाडीलकर, प्रियंका पाडळे, ऋतुजा तनपुरे, पायल रसाळ, अळकुटीच्या साईनाथ विद्यालयाच्या वर्षा नरसाळे, प्रतीक्षा कवडे, पल्लवी वाघ, पूजा नरसाळे, सेनापती बापट विद्यालच्या साक्षी औटी, काजल कावरे, कोमल ठोंबरे, शितल जेजुरकर, मोहिनी औटी, न्यू इंग्लिश स्कूल पारनेरच्या पूजा पठारे, दिव्या औटी, शुभांगी भालेकर, समीना शेख, जामगाव येथील माध्यमिक विद्यालयाच्या पल्लवी मेहेर, आरती मुंजाळ, सुरेखा खाडे यांनी उत्कृष्ट खेळाचे दर्शन घडविले.मुलांचा गटमुलांच्या गटात निघोजच्या अनिकेत पवार, शेखर लामखडे, शुभम साळवे, शेखर लंके, समाधान भांबरे, अमोल ढवळे, तुषार ढवण, वैभव रसाळ, वैभव शिंदे, शुभम ढवण, ऋषिकेश शेटे, अभिषेक पवार, सेनापती बापट विद्यालयाचे प्रतिक माने, यश औटी, ओंकार खेडेकर, सुयश अहिरे, अनिकेत साबळे, जालिंदर सोनवणे, दत्तात्रय वैद्य, महेश झंजाड, वैभव औटी, ज्ञानेश्वर ठाणगे, शुभम ठुबे, बाल गटाचे प्रणय खेडेकर, संकेत कावरे, अल्ताफ शेख, ओंकार हिंगडे, सचिन शेरकर, महेश शेटे ,शुभम विधाटे यांनी उत्कृष्ट खेळाचे दर्शन घडविले. पारनेर न्यू इंग्लिश स्कूल संत निळोबाराय विद्यालय यांच्या संघातील खेळाडुंनी चांगली झुंज दिली. या संघामधून जिल्हा स्पर्धेसाठी संघ निवडला जाणार आहे. (तालुका प्रतिनिधी)
‘मुलिकादेवी’,नागेश्वर मंडळाला विजेतेपद
By admin | Updated: August 17, 2014 23:31 IST