मुळा डॅम विश्रामगृहावर तनपुरे यांनी जलजीवन प्राधिकरण, सार्वजनिक बांधकाम व जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक घेतली. बैठकीत पाणी योजनांवरील थकीत वीज बिलांसंदर्भात चर्चा करण्यात आली. थकीत वीज बिले भरण्याच्या सूचना तनपुरे यांनी केल्या. तसेच पाणी योजनांवरील गळती व इतर अडचणी दूर करण्यासाठी उपाययोजना राबविण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यात या योजनांना मीटर बसविण्याचा महत्त्वाचा निर्णय झाला.
केंदळ खुर्द, मानोरी नदीवरील बंधाऱ्याच्या पुलाचा प्रश्न येत्या काही दिवसात सुटणार आहे. सदर कामाचा प्रस्ताव नाशिक येथील जलसंपदा विभागाकडे अंतिम मंजुरीसाठी दाखल आहे. पुलाच्या दुरुस्तीचा प्रश्न कायमचा सुटणार असून केंदळ खुर्द, मानोरी येथील ग्रामस्थांच्या दळणवळणाचा प्रश्न निकाली निघणार आहे.
या बैठकीस जि. प. सदस्य धनराज गाडे, भास्करराव गाढे, पंचायत समिती सदस्य रवींद्र आढाव, सुरेश निमसे, बाळासाहेब लटके, प्रदीप पवार, अविनाश ओहोळ, काशिनाथ लवांडे, जालिंदर वामन, रवींद्र मुळे, गोविंद मोकाटे, ॲड. अभिषेक भगत, सुयोग नालकर, अमोल भनगडे, सुनील मोरे, बाळासाहेब खुळे, सचिन भिंगारदे, बाबासाहेब भिटे, संतोष आघाव, धीरज पानसंबळ, मुळा पाटबंधारे विभागाच्या अभियंता सायली पाटील, राहुरी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी गोविंद खामकर, पाथर्डी गटविकास अधिकारी शीतल खिंडे, नगर गटविकास अधिकारी धाडगे, नगरचे ग्रामीण पाणी पुरवठा अधिकारी प्रवीण जोशी, पाथर्डीचे अनिल सानप, जि. प. कार्यकारी अभियंता प्रकाश खताळ, पोपटराव भणगे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे परदेशी, जोशी, चव्हाण, पवार उपस्थित होते.