शहरं
Join us  
Trending Stories
1
ENG vs IND : जसप्रीत बुमराहचा 'पंजा'! या ३ चुकांमुळे लीड्स कसोटीत टीम इंडियानं गमावली मोठ्या आघाडीची संधी
2
अमेरिकेच्या इराणवरील हल्ल्यावर फारूक अब्दुल्लांचे विधान; म्हणाले, “आज जागे झाले नाही तर...”
3
पावसाळ्यातही सुरू राहणार नक्षलविरोधी मोहीम; आत्मसमर्पण करा, अन्यथा...शाहांचा अल्टिमेटम
4
अमेरिकेनं इराणवर ज्या B-२ स्टिल्थ बॉम्बर्सनं हल्ला केला त्याची किंमत माहित्येय? तासाला किती खर्च येतो? जाणून थक्क व्हाल
5
Ashadhi Wari : दिवे घाटाची अवघड वाट पार करीत माउलींचा पालखी सोहळा कऱ्हेकाठी विसावला
6
CM देवेंद्र फडणवीसांना पाठवली कायदेशीर नोटीस, असीम सरोदे यांनी दिली माहिती; नेमके प्रकरण काय?
7
"...इराणला आपली अण्वस्त्रे देण्यास तयार!"; रशियाच्या माजी राष्ट्रपतींचा मोठा दावा; उद्या पुतीन यांची खास बैठक
8
अमेरिकेनं इराणवर चालवलं 'मिडनाइट हॅमर', केला ऑपरेशनच्या नावाचा खुलास; म्हणाले, ट्रम्प बोलें तो...!
9
१२५ लढाऊ विमाने, त्यात ७ बी२ बॉम्बर...! इराणला फसविले, पेंटागॉनने सांगितले अणुकेंद्रांवर कसा हल्ला चढविला...
10
ENG vs IND : कायद्यात राहून फायद्यात! जड्डू-साई सुदर्शन जोडीनं रिले कॅचसह लुटली मैफिल (VIDEO)
11
“८ वेळा निवडणुका जिंकलो, आता थांबण्याचा विचार करावासा वाटतो”; भास्कर जाधवांचे सूचक विधान
12
इराण तीन आठवड्यांत ९ अणुबॉम्ब बनवू शकला असता; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर फोर्डोचा सॅटेलाईट फोटो आला...
13
“वारीमुळे रस्ता जाम होतो, आम्ही तक्रार केली नाही”; अबू आझमींचे विधान, CM फडणवीसांचे उत्तर
14
रोहित-विराट वनडे वर्ल्ड कप खेळणं 'मुश्किल'; गांगुलीनं बोलून दाखवली मनातली गोष्ट
15
इस्रायल-इराण युद्धात आता अमेरिकेनंतर होणार रशियाची एन्ट्री? अराघची घेणार पुतिन यांची भेट, म्हणाले...
16
शिंदेंनंतर आता भाजपाने डाव टाकला; शेकडो पदाधिकारी, माजी नगरसेवकांचा ठाकरे गटाला जय महाराष्ट्र
17
डेटिंग अ‍ॅपवरून सुंदर तरुणी कॅफेत भेटायला आली, १२००० रुपयांचे बिल केले आणि पळून गेली... तरुण बिचारा...
18
एअर इंडियाच्या आणखी एका विमानाला बॉम्बची धमकी; सौदी अरेबियात आपत्कालीन लँडिंग
19
आता पैसे नसल्यामुळे शिक्षण थांबणार नाही; 'या' योजनेद्वारे घरबसल्या मिळेल बिनव्याजी कर्ज...
20
DSP सिराजनं बेन स्टोक्सला केलं 'अरेस्ट'! विकेट गमावल्यावर कॅप्टननं हवेत भिरकावली बॅट (VIDEO)

अधीक्षक कार्यालयावर लोहार समाजाचा मोर्चा

By admin | Updated: July 10, 2016 00:35 IST

अहमदनगर : नेवासा तालुक्यातील महेंद्र आगळे खून प्रकरणाचा तपास सीआयडी अथवा स्थानिक गुन्हे शाखा विभागाकडे वर्ग करावा,

अहमदनगर : नेवासा तालुक्यातील महेंद्र आगळे खून प्रकरणाचा तपास सीआयडी अथवा स्थानिक गुन्हे शाखा विभागाकडे वर्ग करावा, या मागणीसाठी लोहार समाज व लोहार यूथ फाऊंडेशनच्या वतीने जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयावर शनिवारी मूक मोर्चा काढण्यात आला.नगर- औरंगाबाद महामार्गावरील पावन गणपती मंदिराच्या सभागृहात लोहार समाजाची बैठक झाली. बैठकीनंतर जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयावर मूक मोर्चा नेण्यात आला. या मोर्चात हर्षल आगळे, दीपक सोनवणे, किशोर सोनवणे, हरीभाऊ हारेर, अशोक दाताळ, मिलिंद सोनवणे, सुधाकर हारेर, अशोक पोपळघट, दशरथ पोपळघट, संजय थोरात, विवेक नन्नवरे, संतोष हारेर, भरत हारेर, शंकर सोनवणे, अजय खंडागळे, बाळासाहेब पोपळघट आदी सहभागी झाले होते़ याबाबत अपर पोलीस अधीक्षक घनश्याम पाटील यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, नेवासा येथील लोहार समाजाचे मच्छिंद्र आगळे हे आपल्या विवाहित मुलगा महेंद्र आगळे यांच्यासह एकत्रित कुटुंबासह ज्ञानोदय हायस्कूलजवळ राहतात़ दि. १९ जून रोजी मच्छिंद्र यांचा मुलगा महेंद्रचा खून झाला. लाजरस देठे व त्यांचे कुटुंबीयांनी आगळे यांच्या घरी येऊन तुमच्या मुलाला संपवणार असल्याचे धमकावून गेले होते. आगळे कुटुंबीयांनी मयत महेंद्रचा शोध घेण्याचा प्रयत्न केला, परंतु तो आढळून आला नाही. त्यानंतर महेंद्र हा गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला़ याबाबत चाौकशीसाठी पोलीस देठे यांच्या घरी गेले असता, तेथे कोणीही आढळून आले नाही. ते अटकेच्या भितीने फरार झाले व अटकपूर्व जामीन करवून घेतला. पोलिसांनी आरोपी लाजरस देठे यांचा जामीन होताना, त्याची गुन्हेगारी प्रवृत्तीची माहिती घेणे आवश्यक होती. देठे परिवारानेच संगनमत करुन आपली गुन्हेगारी दहशत ठेवण्यासाठी महेंद्र आगळे यांचा गळा दाबून खून करुन, त्याला आत्महत्येचे स्वरुप देण्याचा प्रयत्न केला असल्याचे निवेदनात म्हटले आहे. या प्रकरणाचा तपास सीआयडी अथवा एलसीबी विभागाकडे वर्ग करावा. आगळे कुटुंबीयांना पोलीस संरक्षण मिळावे आदी मागण्या यावेळी करण्यात आल्या़ (प्रतिनिधी)