श्रीगोंदा : शहरातील रत्नकमल मंगल कार्यालयात श्रीगोंदेकरांनी लोकसहभागातून ऑक्सिजनची सुविधा असलेले ५० बेडचे संत शेख महंमद महाराज कोरोना हेल्थ केअर सेंटर सुरू केले आहे.
या सेंटरचे उद्घाटन आमदार बबनराव पाचपुते, नगराध्यक्ष शुभांगी पोटे, बाबासाहेब भोस, प्रांताधिकारी स्वाती दाभाडे यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी सतीश बोरा म्हणाले, ‘‘संत शेख महंमद महाराज कोविड सेंटर लोकसहभागातून सुरू केले आहे. यामध्ये सर्वांनी आपल्या इच्छेने सहभाग द्यावा. मदतीसाठी अनेक हात पुढे येत आहेत, ही आनंदाची बाब आहे.’’ यावेळी राष्ट्रवादीचे नेते घनश्याम शेलार, बाजार समितीचे सभापती बाळासाहेब नाहाटा, तहसीलदार प्रदीप पवार, गटविकास अधिकारी प्रशांत काळे, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. नितीन खामकर, मनोहर पोटे, सुरेश भंडारी, बाळासाहेब बळे, राहुल कोठारी आदी उपस्थित होते.
---
२८ श्रीगोंदा काेविड
श्रीगोंदा येथील संत शेख महंमद महाराज कोविड सेंटरचे उद्घाटन करताना आमदार बबनराव पाचपुते व इतर.