श्रीरामपूर : येथील हिंद सेवा मंडळाच्या भि. रा. खटोड कन्या विद्यालयात कवी कालिदास दिन साजरा करण्यात आला.
विद्यालयाचे अध्यक्ष अशोक उपाध्ये, सुनील कपिले यांनी सरस्वती व महाकवी कालिदास यांच्या प्रतिमेला अभिवादन केले. यावेळी पर्यवेक्षिका विद्या कुलकर्णी यांनी कालिदास यांच्या जीवनावर आधारित माहिती दिली. मेघदूत, रघुवंशम, कुमारसंभव अशा दोन खंड काव्य, महाकाव्य नाट्य अशा सप्तकृतींची निर्मिती संस्कृत भाषेत केली. म्हणून त्यांना संस्कृत कवी शिरोमणी मानले जाते, असे कुलकर्णी यांनी सांगितले.
उपाध्ये यांनी संस्कृत विषयाच्या सर्वात अधिक तुकड्या असलेली खटोड कन्या विद्यालय ही शहरातील एकमेव शाळा असल्याचे सांगितले. यावेळी मंगला डोळस, शुभांगी गटणे, सोनाली पुंड, वृषाली कुलकर्णी यांनी कालिदास अष्टक सादर केले. प्रा. विनायक कुलकर्णी यांनी फलक लेखन केले. यावेळी आदिनाथ जोशी यांनी आभार मानले. प्रा. संदीप निकम, मधुकर पवार, कैलास आढाव, अस्लम शेख उपस्थित होते.
----