शिर्डी : ज्या कर्नाटकप्रश्नी ६९ हुतात्मे झाले, शिवसेना प्रमुखांनीही कारावास भोगला, ज्यावर महाराष्ट्र सतत धगधगत राहिला, असा सीमाप्रश्न संपला म्हणणारे कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या लोकशाहीचा अपमान करत असून ते भ्रमिष्ट झाल्याची खरमरीत टीका शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी शिर्डीत केली़मुंबईसह महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर कर्नाटक अस्तित्वात आहे, पण आमचे संबंध सलोख्याचे आहेत़ आम्ही संयम राखलेला आहे, कर्नाटकने केला तसा मुर्खपणा आम्ही करणार नाही, पण महाराष्ट्राच्या हाती असलेली शिवाजी महाराजांची भवानी तलवार शोभेची नाही हे हा प्रश्न संपला असं म्हणणाऱ्यांनी लक्षात ठेवावे. याप्रश्नी अजूनही हुतात्मे देण्याची आमची तयारी आहे, असा सज्जड दमही राऊत यांनी यावेळी दिला़राऊत साईदर्शनासाठी रविवारी सहकुटूंब शिर्डीत आले होते़ काही दिवसांपूर्वी येल्लुर येथे महाराष्ट्राचा फलक लावला म्हणून कर्नाटक पोलिसांनी जे अमानुष अत्याचार केले ते सीमाप्रश्न संपल्याचे लक्षण आहे का?, हा प्रश्न संपला म्हणता तर महाराष्ट्राच्या नावाची पोटदुखी का? असा सवालही यावेळी राऊत यांनी उपस्थित केला़ हा प्रश्न सुटत नाही तोपर्यंत सीमाभाग केंद्रशासित करावा व तेथे केंद्रीय राखीव दलाचे पोलीस नेमावे या राज्यसभेत केलेल्या मागणीचाही त्यांनी यावेळी पुनरुच्चार केला़महाराष्ट्रात दारुबंदीसाठी महिलांना मुंडण करावे लागणे ही लाजिरवाणी गोष्ट आहे. दोन महिन्यांनी हे शासन गेल्यानंतर आऱ आऱ पाटलांसह सर्वांचं मुंडण कसं करायचं याची योजना शिवसेनेकडे तयार असल्याचा टोला राऊत यांनी लगावला. शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी नेतृत्व करावं, अशी जनतेची इच्छा असल्याने मुख्यमंत्री शिवसेनेचाच होईल, असा दावाही राऊत यांनी केला़ (तालुका प्रतिनिधी)
सीमाप्रश्नाला बगल देणारे कर्नाटकचे मुख्यमंत्री भ्रमिष्ट
By admin | Updated: August 17, 2014 23:32 IST