अहमदनगर : पुणे विद्यापीठामध्ये लिपिकाची नोकरी लावून देतो, असे सांगून २४ लाख ५० हजार रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी भिंगार पोलीस ठाण्यात एकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.वैशाली प्रकाश पोटे ( रा. भिंगार) यांनी दिलेल्या फिर्यादित म्हटले आहे की, राजू उर्फ गोपीनाथ सर्जेराव बांगर (रा. दुलेचांदगाव,ता.पाथर्डी) यांनी पुणे विद्यापीठात नोकरी लावून देण्यासाठी २४ लाख रुपये घेतले. ही रक्कम त्यांनी अनेक टप्प्यांत घेतली. मोठी रक्कम देऊनही नोकरी न मिळाल्याने निराश होत पोटे यांनी अखेर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. या प्रकरणी पोलिसांनी बांगर याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बांगर यांनी खोटी कागदपत्रे दाखवून पोटे यांची फसवणूक केल्याचेही पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे.
नोकरीच्या आमिषाने गंडा
By admin | Updated: August 14, 2014 01:48 IST