पिंपळगाव माळवी : नगर तालुक्यातील पिंपळगाव माळवी येथे मागील काही दिवसांपासून कोरोना रुग्णांची संख्या वाढत असून, आतापर्यंत किमान वीस ग्रामस्थांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. सध्या गावात किमान दोनशे ते तीनशे कोरोनाचे संशयित रुग्ण आहेत; परंतु ग्रामस्थ याबाबत कोरोना चाचणी न करताच खासगी उपचार घेत आहेत. त्यामुळे कोरोनाची साखळी तुटत नाही. गावात प्राथमिक व माध्यमिक विद्यालयात कोरोना विलगीकरण कक्ष सुरू करण्यात आला आहे; परंतु याकडे ग्रामस्थांनी कानाडोळा केला आहे. फक्त दोनच रुग्ण या ठिकाणी आहेत. त्यामुळे कोरोना ग्राम सुरक्षा समितीची नुकतीच बैठक झाली व त्यामध्ये एकमताने पिंपळगाव माळवीत चार मे पासून बारा मे पर्यंत जनता कर्फ्यू जाहीर करण्यात आला आहे. या काळात फक्त अत्यावश्यक वैद्यकीय सेवा, मेडिकल, दूध संस्था चालू राहतील व इतर सर्व व्यवहार बंद राहणार आहेत.
पिंपळगाव माळवीमध्ये आजपासून जनता कर्फ्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 4, 2021 04:10 IST