शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताबद्दल लिहिली भलीमोठी पोस्ट; मग मोदी काय म्हणाले? वाचा
2
Balendra Shah: काठमांडूचे 'रॅपर', महापौर बालेंद्र शाह होणार नेपाळचे नवे पंतप्रधान?
3
नेपाळमध्ये लष्कराने कमान सांभाळली, एअर इंडिया-इंडिगोच्या विमान उड्डाणे रद्द
4
कोणत्या खासदारांनी क्रॉस व्होटिंग केली? सर्वत्र चर्चा; महाराष्ट्रासह 'या' राज्यातील खासदार संशयाच्या भोवऱ्यात
5
आता टेन्शन फ्री होईल मध्यम वर्ग; या ५ सरकारी स्कीम करतील तुमची रिटायरमेंट आणि सेव्हिंग सुपर सेफ, पाहा कसं?
6
Asia Cup 2025: सूर्यकुमारने पाकिस्तानच्या कर्णधाराशी हात मिळवला की नाही? Video झाला व्हायरल
7
Crime: संतापजनक! चालत्या कॅबमध्ये विद्यार्थिनीसमोर हस्तमैथुन, चालकाला अटक!
8
Genz Protests Nepal: तरुणाईच्या आगीत नेपाळ स्वाहा! नेत्यांच्या भ्रष्टाचाराने जेरीस, सोशल मीडिया बंदीने ओतले तेल
9
हैदराबाद गॅझेटियरनंतर सरकारची नवी हालचाल; मराठा उपसमितीने उचलले महत्त्वाचे पाऊल 
10
"मी भाऊ कदमकडून खूप काही शिकलो", मनोज वाजपेयीकडून अभिनेत्याचं भरभरुन कौतुक, म्हणाला...
11
भारताच्या 'आयटी'वर नवे संकट! 'या' कंपन्यांवर २५ टक्के कर लावण्याचा अमेरिकी खासदाराचा प्रस्ताव
12
आजचे राशीभविष्य - ९ सप्टेंबर २०२५: जिभेवर ताबा ठेवावा लागेल, वरिष्ठांशी वाद होण्याची शक्यता
13
'भारत-अमेरिका पक्के मित्र, व्यापार करारावर चर्चा सुरू'; ट्रम्प यांच्या पोस्टला पंतप्रधान मोदींचे उत्तर
14
अग्रलेख: भडकलेली 'जेन-झी'! भारताला अधिक सजग राहावे लागणार
15
टोळीयुद्धाने हादरली नवी मुंबई; गुंड राजकुमार म्हात्रेला मारहाण, खुटारीमध्ये हवेत गोळीबार
16
धुमसते नेपाळ : संसद पेटविली; सर्वोच्च न्यायालय आणि अॅटर्नी जनरल कार्यालयात तोडफोड
17
मालेगाव २००८ बॉम्बस्फोट: प्रज्ञा ठाकूर, पुरोहितसह ६ जणांच्या मुक्ततेला उच्च न्यायालयात आव्हान
18
विशेष लेख: उपराष्ट्रपतिपदाच्या खुर्चीत 'खेळात न उतरणारा खेळाडू'
19
Apple Awe Dropping Event : Apple नं लाँच केला सर्वात स्लीम iPhone 17 Air! जाणून घ्या, किंमत अन् संपूर्ण स्पेसिफिकेशंस
20
Asia Cup 2025: कधी अन् कुठं पाहता येईल IND vs UAE मॅच? कसा आहे दोन्ही संघांमधील हेड-टू-हेड रेकॉर्ड?

मुख्याधिकार्‍यांना घातला घेराव

By admin | Updated: May 27, 2014 00:30 IST

पाथर्डी : पालिकेचे मुख्याधिकारी एन. व्ही. महानवार सोमवारी पंधरा दिवसानंतर पालिकेत आले असता अंतिम मंजुरीच्या सह्या का करीत नाहीत, बांधकाम परवानगीचे पत्र का देत नाहीत

पाथर्डी : पालिकेचे मुख्याधिकारी एन. व्ही. महानवार सोमवारी पंधरा दिवसानंतर पालिकेत आले असता अंतिम मंजुरीच्या सह्या का करीत नाहीत, बांधकाम परवानगीचे पत्र का देत नाहीत आदी प्रश्नांचा भडिमार करीत संतप्त तरुणांनी मुख्याधिकार्‍यांना घेरावा घातला. सह्या करणार नसाल तर तसे लेखी द्या, अशी मागणी करताच मुख्याधिकारी कार्यालय सोडून निघून गेले़ त्यानंतर युवकांनी मुख्याधिकार्‍यांच्या खुर्चीला हार घालत गांधीगिरी केली. पालिकेचे नगराध्यक्ष अभय आव्हाड व सत्ताधारी नगरसेवकांनी दोन दिवसापूर्वी जिल्हाधिकारी अनिल कवडे यांची भेट घेऊन मुख्याधिकारी पालिकेत दहा-दहा दिवस येत नाहीत़ त्यामुळे नागरिकांचे हाल होत आहेत. तसेच विकास कामांचे कार्यारंभ देताना लाच मागतात, असे आरोप करीत त्यांच्या चौकशीची मागणी केली होती. यामुळे पालिकेत सत्ताधारी विरुद्ध मुख्याधिकारी असा सामना रंगला आहे़ सोमवारी सकाळी मुख्याधिकारी पालिका कार्यालयात आले. त्यानंतर थोड्याच वेळात सोमनाथ बोरुडे, ज्ञानेश्वर कोकाटे, अक्षय काळे, राजू बोरुडे, बाळासाहेब बोरुडे आदी सुमारे २०-२५ युवकांनी त्यांच्या कार्यालयात जाऊन मुख्याधिकार्‍यांना घेराव घातला़ मारुती मंदिर रस्त्यावर स्ट्रीट लाईटची निविदा काढण्यास विलंब का लावता, पाच-पाच महिने बांधकाम परवाने का देत नाहीत, असे प्रश्न उपस्थित करुन सह्या करणार नसाल तर तुमचे काय म्हणणे आहे ते लेखी द्या अशी मागणी युवकांनी करताच मुख्याधिकारी कार्यालयातून निघून गेले़ त्यानंतर संतप्त युवकांनी त्यांच्या खुर्चीला हार घालीत गांधीगिरी केली. त्यानंतर युवकांनी नगराध्यक्ष अभय आव्हाड यांची भेट घेतली़ या वेळी नगरसेवक बंडू बोरुडे, पांडुरंग सोनटक्के आदी उपस्थित होते. तुमचा प्रश्न मार्गी लावला जाईल, असे आश्वासन नगराध्यक्षांनी दिले. रखडलेली कामे मार्गी लावण्यासाठी सोमवारी पालिकेत नागरिकांची मोठी गर्दी झाली़ परंतु मुख्याधिकारी निघून गेल्याने कामे घेऊन येणार्‍यांनाही रिकाम्या हातानेच परतावे लागले़ (तालुका प्रतिनिधी) मुख्याधिकारी पालिकेत येत नसल्यामुळे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. त्यांच्या वागण्यामुळे नागरिकांचा रोष सहन करावा लागत आहे. शहरात आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. टंचाईचे त्यांना काही घेणे देणे नाही़ -अभय आव्हाड, नगराध्यक्षमंजूर कामांना अंतिम मान्यता देण्यासाठी मुख्याधिकारी पी़ एऩ महानवार टाळाटाळ करतात, असा आरोप करीत सोमवारी संतप्त तरुणांनी मुख्याधिकार्‍यांच्या खुर्चीला हार घालून गांधीगिरी केली़